मी आयएएस होण्यास मौलाना आझाद यांची शिक्षण निती- जी.श्रीकांत
मी आयएएस होण्यास मौलाना आझाद यांची शिक्षण नीतीचे दखल- जी श्रीकांत...
मौलाना आझाद जयंतीनिमित्त एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन*
औरंगाबाद, दि. 11(डि-24 न्यूज) एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते आज मी या महापालिकेचा आयुक्त भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वतंत्र भारतासाठी घडलेली शिक्षण नीतीमुळे झालो आणि याबाबत मी मौलाना सारख्या व्यक्तिमत्वाचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज केले.
आज दि 11 नोव्हेंबर रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात येते, यानिमित्त महानगरपालिका अंतर्गत भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, लोकसेवा एज्युकेशन सोसायटीच्या आर्टस् ऍण्ड सायन्स कॉलेज, मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स ऍण्ड कॉमर्स, डॉक्टर रफिक झकेरीया कॉलेज फॉर विमिन आणि डॉक्टर रफिक झकेरीया सेंटर फॉर हायर लर्निंग अँड ॲडव्हान्स रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमानाने रिसर्च मेथोडोलॉजी या विषयावर आज एक दिवसीय परिसंवाद आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जी श्रीकांत यांच्या हस्ते परिसंवादाचे पहिले सत्राचे उद्घाटन करण्यात आले, यानिमित्त ते बोलत होते.
ते म्हणाले की मौलाना आझाद यांनी स्वतंत्र भारताला जी शिक्षण व्यवस्था दिली त्यामुळेच मी तिकीट कलेक्टर पासून ते डिस्ट्रिक कलेक्टर होण्यास यशस्वी झालो आणि माझ्या या यशाचे श्रेय कुठे ना कुठे आमच्या भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांची शिक्षण नीतीला जाते. शिक्षण वर बोलताना ते म्हणाले की औरंगाबाद महानगरपालिका ही अशी पहिली महापालिका आहे की जिथे महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी सतत तीन दिवस गैरहजर राहिल्यावर शिक्षक त्यांच्या वडिलांना फोन करून याचे कारण विचारतात आणि जे काही कारणामुळे विद्यार्थी शाळेला येत नाही त्या कारणाचे निवारण करण्याचे प्रयत्न केले जातात. या कामासाठी जेव्हा कॉल सेंटर सुरू करण्यासाठी जागेच्या शोध माझे अधिकारी घेत होते तेव्हा मी म्हणालो की सदरील कॉल सेंटर मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र याच ठिकाणी सुरू करावे, ही एका प्रकारे भारताचे पहिले शिक्षणमंत्री यांना महापालिकेतर्फे मानवंदना असेल, ते म्हणाले.
सदरील कार्यक्रमात डॉ. ए. जी. खान, तत्कालीन व्यवस्थापक बीसीयूडी बामु, डॉ. शेख लियाकत, मुख्याध्यापक लोकसेवा कॉलेज, डॉ. मजहर फारुखी, मुख्याध्यापक मौलाना आझाद कॉलेज, डॉ मखदूम फारुखी, मुख्याध्यापक डॉक्टर रफिक झकेरीया कॉलेज फॉर विमिन, डॉ मुस्तजीब खान, प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश बामु, अहमद तौसीफ, जनसंपर्क अधिकारी मनपा तथा व्यवस्थापकीय संचालक मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, डॉ. रशीद मदनी, डॉ अख्तर मिर्झा बेग यांची कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर रिसोर्स पर्सन म्हणून डॉ. नागराज होडियनवार, कर्नाटका, आणि डॉक्टर आनंद उबाळे, प्राध्यापक बामु यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे कन्व्हेनर म्हणून डॉक्टर शेख परवेज असलम, डॉक्टर काझी नवीद, डॉक्टर फैसल अहमद, डॉक्टर फैय्याज फारुखी आणि आबेद अली, समन्वयक मौलाना आझाद संशोधन केंद्र यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर शेख परवेज असलम यांनी केले आणि सूत्रसंचालन डॉक्टर फैय्याज यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रवज्वलनाने करण्यात आली.
What's Your Reaction?