ठेचा भाकरी खाऊन कोविड योध्दांची दिवाळी...!

 0
ठेचा भाकरी खाऊन कोविड योध्दांची दिवाळी...!

ठेचा भाकर खाऊन कोविड योद्ध्यांची दिवाळी... ! औरंगाबाद दि. 11(डि-24 न्यूज) शिंदे-फडणवीस- पवार खातात लाडु करंजा आम्ही खातो ठेचा भाकर अशा घोषणा देत कथित कंञाटी कामगार कोविड योद्ध्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय औरंगाबाद आरएमओ ऑफीस समोर बसुन ठेचा भाकरी खाल्ली व 98 कथीत कंत्राटी कामगारांना कोविड योद्ध्यांना सेवेत सामाऊन घ्या अशी मागणीही केली.

याबाबत असे की, कोव्हीड महामारीच्या दोन्हीही लाटेत ज्यांच्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद व जिल्हा प्रशासनाला मोठी मदत झाली, त्यांना

काविड योध्दा म्हणून घाटी प्रशासनाने प्रमाणपत्रही दिले. त्यांच्यासाठी टाळया-थाळया वाजवण्यात

आल्या, दिवे विझवण्यात आले, पुष्प वृष्टी करण्यात आली, जेंव्हा कोविड वार्डात जायला भिती

वाटत होती, तेंव्हा वरील 98 कथीत कंत्राटी सफाई कामगारांनी कोविड रुग्णांची सुश्रुशा केली,

वयोवृध्द रुग्णांचे डायपर बदलले, त्यांना पाणी, जेवण दिले, मृत्यू झालेल्या कोविड रुग्णांचे

पार्थीव शरीर व्यवस्थीतपणे अंत्य संस्कारासाठी रवाना केले. अशा प्राणांची बाजी लावणा-या व

कठीण परिस्थीतीत प्रशासनाला मदत करणा-या 98 कोविड योद्यांना निराधार केले जात आहे.

गरज सरो कोविड योध्दा मरो, असा प्रकार सुरु आहे. तेंव्हा विशेष बाब म्हणून, तसेच कोविड काळातील या 98 कोविड योध्दांच्या कामाचे साक्षीदार म्हणून आपण त्यांना सेवेत सामावुन घ्यावे, प्रत्येक कथीत कंत्राटी सफाई कामगारांच्या

नावाने सरकारी तिजोरीतून दरमहा जवळपास 15 हजार रुपये खर्च होतात, परंतू प्रत्यक्षात कामगारांच्या हातात जवळपास 10 रुपये दरमहा एवढीच रक्कम मिळते. तेंव्हा सरकारी तिजोरीतून त्याच्या नावे बाहेर पडणारे दरमहा 15 हजार रुपये एवढी तरी त्यांना थेट मिळावे, जेणेकरुन सरकारी तिजोरीवरही ताण येणार नाही व प्रशासनाला पडत्या काळात मदत करणा-या प्रामाणीक, कष्टाळू अशा 98 योध्दांच्या कामाची जाण ठेवली, असा देखील संदेश कामगारांमध्ये जाईल यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 11 दिवसांपासुन साखळी उपोषण सुरु आहे त्याकडे जिल्हाधिकारी व अधिष्ठाता घाटी हाॅस्पीटल यांनी दुर्लक्ष केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जवळपास अधिकृत 1700 रुग्ण क्षमता असतांना त्यापेक्षा तीन पट जास्त रुग्ण भरती होतात, रोज जवळपास रुग्ण व नातेवाईक मिळून दहा हजार नागरीक घाटी

हॉस्पीटलमध्ये येतात. सद्या स्थीतीत घाटी हॉस्पीटलमध्ये जवळपास एक हजार चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची आवश्यकता आहे. घाटीत रुग्णांना स्ट्रेचरवर व व्हील चेअरवर नेण्याचे काम

नातेवाईकांनाच करावे लागते, एक हजार सफाई कामगारांची भरती केल्यास रुग्ण सेवा आणि

स्वच्छता योग्य रितीने राखता येईल. घाटीतील अस्वच्छता हा कायम चर्चेचा विषय ठरत आहे

पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे उपोषनार्थी 98 सफाई कामगारांवर कामाचा ताण वाढत आहे,

टीसीएस कंपनी मार्फत 148 कामगारांच्या भर्तीचा निर्णय 98 उपोषनार्थी कोविड योद्धांवर

अंन्याय करणारा आहे. यापुर्वी घाटी प्रशासन, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी

दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तसेच विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर

केल्याप्रमाणे, तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे उपोषनार्थी 98 कथीत

कंत्राटी कामगार काविड योद्धांना सेवेत सामाऊन घ्या, त्यानंतर उर्वरीत जागांसाठी भरती करावी

अशी मागणी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीकडे

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 

नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. लवकरात लवकर न्याय देऊन उपोषण संपवण्यास मदत करावी, सदर उपोषनार्थी रुग्ण सेवेस अडथळा न निर्माण करता, प्रशासनास सहकार्य करुन शासकीय वैद्यकीय

महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे रोज डयुटी करुन जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

समोर उपोषणात सहभागी होत आहेत. यावेळी उपोषण मंडपात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे फडणवीस पवार तुपाशी कोविड योद्धा उपाशी, कोविड योद्ध्यांना सेवेत सामावुन घेतलेच पाहीजे, काम घ्यायला गोड वाटत पगार द्यायला कडु वाटत, शिंदे फडणवीस खातात लाडु करंजा आम्ही खातो ठेचा भाकर इत्यादी घोषणाही दिल्या. सोबत आणलेली ठेचा भाकर यावेळी अॅड अभय टाकसाळ, अभिजीत बनसोडे , गजानन खंदारे, आतिश दांडगे ,गौतम शिरसाठ , श्रीयोग वाघमारे , निलेश देवकर ,दीपक मगर , अमित भालेराव , सुशील कांबळे, संतोष बिरारे ,सय्यद आरिफ ,विजय नागोबा ,आनंद सुरडकर ,सिद्धार्थ नरवडे ,दिनेश साळवे ,दिपक जाधव ,आनंद पर्घने नंदा हिवराळे , विद्या हिवराळे , उषा भिंगारे , मनीषा हिवराळे ,दीपिका पंडित, ज्योती खरात ,वनिता जाधव , आम्रपाली जोगदंड ,मनीषा हिवराळे , सविता घागरे, नूतन शेजुळ , उषा कांबळे ,उषा साबळे ,रेशमा सय्यद, पूजा बोध , उज्वला वाघमारे, मनिषा सातपुते,सोनाबाई हजारे ,विद्या इंगळे,संध्या साळवे ,वंदना भालेराव , वंदना बोर्डे यांनी खाऊन सहभाग नोंदवला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow