दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद...
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- लासूर स्टेशन येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्या जवळून धारदार शस्त्रासह फोर्ट कंपनीची कार, बनावट पिस्टल, मोबाईल व अन्य साहित्यासह तीघांना अटक केली आहे दोन जण पळून गेले.
गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री मिळालेल्या माहितीच्या आधारे लासूर स्टेशन ते ए.एस.क्लब जाणारे रोडवर सावंगी शिवारातील हाॅटेल अभिनंदन समोर कार्यवाहीसाठी पोहोचले. सदर ठिकाणी हजर असलेले इसमांना पोलिसांची चाहुल लागताच पळून जावू लागले त्यापैकी चंदु जमाल शेख, वय 37, राहणार टेरवोट हिलालनगर, देगलुरनाका, राज्य तेलंगणा, मोहम्मद तय्यब मियां, वय 35, राहणार जैलाबुद्दीन गल्ली, म्हैसा ता. निर्मल, जिल्हा आदीलाबाद, राज्य तेलंगणा, विधिसंघर्ष बालक यांचा पाठलाग करत शिताफिने पकडले. दोन इसम पळून गेले. हे सर्व दरोडा टाकण्याच्या तयारीत हत्यारासह मिळून आले. त्यांच्याकडून एक विना क्रमांक फोर्ट कार, हत्यार, बनावट पिस्टल, गलूर, लोखंडी टाॅमी, बनावट नंबर प्लेट, मिरची पावडर, नायलॉन दोरी, दोन धारदार चाकू, पळून गेलेल्या इसमांचे व पकडलेल्या इसमांचे मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर तेलंगणा, नांदेड व इतर ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिल्लेगाव पोलिस ठाण्यात आरोपिंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राठोड, सपोनि पवन इंगळे, पोह वाल्मिक नीकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे, संजय तांदळे, योगेश तरमळे यांनी केली आहे.
What's Your Reaction?