मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराच्या दौऱ्यावर, भाजपा कार्यालयाच्या इमारतीचे करणार उद्घाटन...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या शहरात, भाजपाचे कार्यालयाच्या इमारतीचे करणार उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या रविवारी शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या शुभहस्ते चिकलठाणा येथील भाजपा कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
या इमारतीचा मंत्री अतुल सावे, खासदार डॉ भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजय केनेकर व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा घेत उद्घाटनाची जय्यत तयारी केली आहे.
सकाळी 11.50 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर आगमन होईल. मोटारीने 12 वाजता भाजपा कार्यालय चिकलठाणा येथे आगमन व उद्घाटन करतील. दुपारी 1.15 वाजता सिडको बसस्थानक कडे प्रयाण. 1.20 वाजता हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक पुतळा व परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा. दुपारी 2.10 वाजता मोटारीने श्रीयश प्रतिष्ठान, सातारा परिसर, बीड बायपास रोड, एसआरपीएफ कॅम्प जवळ प्रयाण, 3 वाजता श्रीयश आयुर्वेदिक काॅलेज आणि हाॅस्पिटल रिसर्च सेंटरच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करतील.
सायंकाळी मोटारीने संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, 4.40 वाजता विमानाने प्रयाण.
What's Your Reaction?