ब्रेकिंग न्यूज...भगवे कपडे परिधान करून पहील्यांदाच इम्तियाज जलिल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात...
ब्रेकींग न्युज...भगवे कपडे परिधान करून इम्तियाज जलिल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात...या कार्यक्रमात येत नसल्याने दरवर्षी विरोधक त्यांच्यावर टिका करत... यंदा त्यांनी सर्वांना धक्का दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- आज मोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सिध्दार्थ उद्यान येथे मुख्य ध्वजारोहण व शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मुख्यमंत्री येण्यापूर्वी येथे वेगळेच चित्र बघायला मिळाले त्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलिल हे पहिल्यांदाच या कार्यक्रमात हजर झाले आणि तेही भगवे कपडे परिधान करून. याप्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदिपान भुमरे, महापौर समीर राजूरकर, शिवसेना उबाठाचे नेते चंद्रकांत खैरे, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे व मोठ्या प्रमाणात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व नेत्यांसोबत हस्तांदोलन करताना इम्तियाज जलिल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांना पैसे परत मिळावे यासाठी त्यांनी आजचे गणिमी कावा आंदोलन स्थगित केले. ते येथे या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन तर देणार का अशीही चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.
What's Your Reaction?