डॉ.विजय मेहेत्रे यांना मराठवाडा रत्न पुरस्कार, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
डॉ. विजय मेहेत्रे यांना ‘मराठवाडा रत्न पुरस्कार 2026’ प्रदान
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- लेझर डेंटिस्ट्री क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्य करून दंतचिकित्सा क्षेत्रात नवे योगदान देणारे डॉ. विजय मेहेत्रे यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला.
Reseal.in यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते डॉ. विजय मेहेत्रे यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा 13 सप्टेंबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला.
डॉ. विजय मेहेत्रे हे MDS Periodontics असून लेझर डेंटिस्ट्री आणि ओरल इम्प्लांटोलॉजी या क्षेत्रात त्यांचा विशेष अभ्यास व व्यापक क्लिनिकल अनुभव आहे. मराठवाड्यात लेझर डेंटिस्ट्रीचा प्रसार आणि प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा दंतचिकित्सेमध्ये प्रभावी वापर करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.
या सन्मानाबद्दल बोलताना डॉ. विजय मेहेत्रे यांनी सांगितले की, “मराठवाड्यात लेझर डेंटिस्ट्रीच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. हा सन्मान माझ्या कार्याला आणखी व्यापक करण्याची जबाबदारी वाढवणारा आहे.”
या पुरस्कारामुळे मराठवाड्यातील लेझर डेंटिस्ट्री क्षेत्रातील डॉ. विजय मेहेत्रे यांच्या कार्याला विशेष मान्यता मिळाली असून, त्यांच्या या यशाबद्दल दंतचिकित्सा क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी व हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात आले.
What's Your Reaction?