श्रीराम मंदिर देणगी अपहाराच्या निषेधार्थ शिवसेनेचा श्रीराम रक्षा घंटानाद

 0
श्रीराम मंदिर देणगी अपहाराच्या निषेधार्थ शिवसेनेचा श्रीराम रक्षा घंटानाद

अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी अपहाराच्या निषेधार्थ शिवसेनेचा श्रीराम रक्षा घंटानाद...

सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद, महाआरती व भजनांनी दुमदुमला परिसर...

छत्रपती संभाजीनगर, दि.5(डि-24 न्यूज)-अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगीत झालेल्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या 'श्रीराम रक्षा घंटानाद' आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते,आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली रविवारी 5 जुलै रोजी गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरात जिल्हाव्यापी घंटानाद, महाआरती आणि भजन सोहळा संपन्न झाला. 

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक व रामभक्तांनी मंदिर परिसर, राम मंदिर देणगीत अपहार करणाऱ्यांचा धिक्कार असो!...रामद्रोह, हिंदुद्रोह म्हणजेच देशद्रोह!!..श्रद्धेचा पैसा लुटणाऱ्यांना माफी नाही! आणि सियावर रामचंद्र की जय! व 'जय श्रीराम' च्या घोषणांनी दणाणून सोडला. प्रभू श्रीरामांच्या श्रद्धेचा आणि रामभक्तांच्या विश्वासाचा झालेला अपमान सहन केला जाणार नाही, असा संदेश देत घंटानाद करून निषेध व्यक्त करण्यात आला.

 देणगी उपहाराच्या निषेधार्थ हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर गणरायाची आरती, भगवान शंकर-पार्वतीची आरती तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीची आरती करून प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अशा दातार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध महिला भजनी मंडळांनी विविध भजने, अभंग आणि गवळणी सादर केल्या. प्रभू श्रीरामावरील अखंड श्रद्धा व्यक्त करत रामभक्तांच्या भावना जागृत करणारी सादरीकरणे करण्यात आली. भजनांच्या सुरांनी आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने मंदिर परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमात आदेश महिला भजनी मंडळ, शिव पार्वती महिला भजनी मंडळ, रामेश्वर महिला भजनी मंडळ, शिव भक्ती मंडळ आणि जानकी भजनी मंडळ यांनी सादर केलेल्या विविध अभंग, भजने आणि गवळणी मुळे उपस्थित राम भक्तगण भक्तिरसात तल्लीन झाले होते. 

भजन कार्यक्रमानंतर सामूहिक महाआरती करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी प्रभू श्रीरामांचा जयघोष करत हातात घंटा घेऊन जोरदार घंटानाद केला. मंदिर परिसरात घुमणाऱ्या घंटांच्या निनादातून श्रीराम मंदिर देणगीतील अपहाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाद्वारे श्रीराम मंदिराच्या देणगीतील प्रत्येक रुपयाचा हिशेब जनतेसमोर मांडावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रामभक्तांच्या श्रद्धेचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. 

याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सुनील सिंग कच्छवे, जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, उपजिल्हाप्रमुख संतोष खेडके, हिरा सलामपुरे, किशोर कच्छवाह, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, वीरभद्र गादगे, गिरीश चपळगांवकर, तालुकाप्रमुख विष्णू जाधव, आनंद भालेकर, मनपा गटनेते गणेश लोखंडे, नगरसेवक राशीद मामू, रामेश्वर कोरडे, राहुलकुमार सोनवणे, बापू कवळे,उपशहरप्रमुख संदेश कवडे, प्रितेश जैस्वाल, सोमीनाथ नवपुते, पुरुषोत्तम पानपट, कमलाकर जगताप, गोरख सोनवणे, नरेश देवतवाल, नारायण कानकाटे, चंद्रकांत देवराज,शिवकुमार देशमुख, श्रीकृष्ण पांचाळ, भारत ढवळे,महिला आघाडी सहसंपर्क संघटक सुनीता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, शहर संघटक सुनीता सोनवणे, मीरा देशपांडे, रेणुका जोशी, रुपाली मुंदडा, अरुणा पुणेकर, सुचेता पुणेकर व कोमल पांढ

रे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow