एमआयएम नंतर नाशिक टिसीएस प्रकरणात इस्लाम पार्टीची इंट्री, आसिफ शेख शहरात म्हणाले साथ देणार...!

 0
एमआयएम नंतर नाशिक टिसीएस प्रकरणात इस्लाम पार्टीची इंट्री, आसिफ शेख शहरात म्हणाले साथ देणार...!

एमआयएम नंतर नाशिक TCS प्रकरणात 'इस्लाम पार्टी'ची एन्ट्री, न्यायालयात वकील दिला; आसिफ शेख म्हणाले, 'ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली तरी लढणार...'

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)-

देशात आणि राज्यात सत्ताधारी पक्ष व हिंदूत्ववादी संघटना मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहे. त्याचाच एक भाग नाशिक येथील TCS धर्मांतरण प्रकरणात मुस्लिम समाजाला बदनाम करण्यासाठी या प्रकरणाची मीडीया ट्रायल करुन आगीत तेल टाकण्याचे काम सुरू आहे. आम्हाला न्यायालयावर व संविधानावर विश्वास आहे जे लोक तुरुंगात आहेत ते निर्दोष सुटतील असा विश्वास आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथे पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले. नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणाला आता एक नवे राजकीय वळण मिळाले आहे. 'एमआयएम' पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी यापूर्वी या प्रकरणातील आरोपी निदा आश्रय दिल्याचे उघड झाले असतानाच, आता मालेगावच्या 'इस्लाम पार्टी'ने या प्रकरणात एन्ट्री केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना आता इस्लाम पार्टीकडून कायदेशीर मदत पुरवली जात आहे. आज नाशिक न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख स्वतः न्यायालयात हजर होते. अशी त्यांनी कार्यक्रमात कबुली दिली.

इस्लाम पार्टीने या खटल्यासाठी स्वतंत्र वकील दिला असून, त्यांच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांनी न्यायालयात आरोपी दानिश शेख याची बाजू मांडली. "हे प्रकरण भविष्यात सर्वोच्च न्यायालयात जरी गेले, तरीही इस्लाम पार्टी ही कायदेशीर लढाई लढणार," अशी घोषणा माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. 

आरोपी दानिश शेखचे वकील फैज वसीफ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "निदा खान प्रकरणी आम्ही दानिश याच्या वतीने उपस्थित होतो. सरकारी वकील, फिर्यादी वकील आणि आम्ही संयुक्त युक्तिवाद केला. कोर्टात अनेक मुद्दे उपस्थित केले. दानिश याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात आली, त्यानंतर एमसीआर केला. दानिश याचा अर्ज पहिल्यांदाच केला आणि तो फेटाळण्यात आला आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख म्हणाले की, "टीसीएस प्रकरण नाशिकमध्ये झाले, त्यात धार्मिक रूप देण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी सर्व काम करत होते, त्यांच्यात मैत्री होती. त्याला धार्मिक रूप दिले गेले. काही जातीवादी लोकांनी हे काम केले. दानिश शेख याच्या घरचे आमच्याकडे आले, ते घाबरले होते. आम्ही वकील दिला, ते काम पाहत आहेत. माझ्या घराचे कागदपत्र व्यवस्थित आहे. धार्मिक रंग दिला जात असेल तर आम्ही राजकारणी मदत करत होतो. आम्ही पुढे देखील अशी लढाई लढू. ही लढाई नाशिक कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेली तरी आम्ही आणि इस्लाम पार्टी उभे राहू," असे त्यांनी म्हटले.

नाशिकमधील या कथित कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्यासह इतर दोन आरोपींच्या जामीन अर्जावर आता 19 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आज न्यायालयात आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेण्यात आली. कोर्ट आता 19 जून रोजी या जामीन अर्जावर निकाल देणार आहे. तत्पूर्वी, या सुनावणीसाठी याआधीही दोन वेळा तारीख देण्यात आली होती. या आगामी सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाची बाजूही ऐकून घेतली जाणार आहे.

आसिफ शेख यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले मुस्लिम समाजाच्या सणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. गोवंशची मुस्लिम समाज कुर्बानी देत नाही तरीही राज्यातील काही लोकांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, माॅबलिंचिंग, बुलडोझर कारवाई करुन त्रास देण्याचे काम सुरू आहे. कायदा हातात न घेता कायद्याच्या चौकटीत राहून हि लढाई आम्ही लढणार आहे. कोणताही पक्ष मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायावर बोलत नाही. आम्ही उघडपणे अन्याय पिडीत लोकांसाठी राजकीय व कायदेशीर लढाई लढणार आहे. सत्ताधारी पक्षांसोबत हातमिळवणी करून एमआयएम आपली राजकीय पोळी भाजत आहे. मुस्लिम मतांचा एमआयएम वापर करत आहे. शहरात शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी उद्घाटन केले परंतु शाळा तर सुरू झाली नाही ती जागाच यांनी विकून खाल्ली. मालेगावात रुग्णालयात बांधणार तेथेही असेच घडले. आमदार, खासदार येथील जनतेने निवडून दिले परंतु शहराचा विकास तर झालाच नाही तर स्वतःचा मन्नत बंगला इम्तियाज जलिल यांनी बांधला. शहराचे नामांतर त्यांना रोखता आले नाही. आता यांच्या भुलथापांना शहरातील जनता बळी पडणार नाही तर इस्लाम पार्टी हि विकल्प म्हणून पुढे आली आहे. सर्व जाती धर्मातील लोकांचे प्रश्न उपस्थित करुन पक्ष संघटना मजबूत करणार आहेत. नवीन कार्यकारिणी चांगले काम करतील असा विश्वास आसिफ शेख यांनी व्यक्त केला. एमआयएम पक्ष सत्ताधारी पक्षांना कसा साथ देतात यांचे माध्यमांवर आलेल्या बातम्यांचे व्हिडिओ दाखवून पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. आता याला एमआयएम पक्ष कसे उत्तर देणार हे बघावे लागेल.

कटकट गेट येथील एका लाॅन्समध्ये पदाधिकारी यांच्या नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपा व एमआयएम पक्षावर आपल्या भाषणात हल्लाबोल केला.

व्यासपीठावर नवनियुक्त शहराध्यक्ष रफत यारखान, युवा शहराध्यक्ष अबुल हसन हाश्मी, प्रवक्ते आरेफ हुसेनी, जफर बिल्डर, सलिम पटेल बोरगांवकर, गाजी सदाउद्दीन, शकीला पठाण, नदीम राणा, मेहरुन्नीसा खान उर्फ मोटे भाभी, जमील खान, अजहर पठाण, अबु लाला हाश्मी, जलिल खान, इलियास खान, शेख मुश्ताक, अजीम पटेल, अफसर पठाण व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow