महापालिकेची शहरासाठी पुढील 30 वर्षासाठी जलनिती, नागरीकांना आक्षेप दाखल करता येणार

 0
महापालिकेची शहरासाठी पुढील 30 वर्षासाठी जलनिती, नागरीकांना आक्षेप दाखल करता येणार

महापालिकेची शहरासाठी पुढील 30 वर्षांसाठी स्वतंत्र जलनीती

जलनीती बाबत नागरिकांना आक्षेप दाखल करता येणार...

 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)

शहरातील पुढील 30 वर्षांचे नियोजन, त्यासाठी लागणारे पाणी परिमाण, शहरासाठी असलेला जायकवाडी जलाशय हा एकमेव उद्भव, भविष्यातील वाढती लोकसंख्या, शहरामध्ये राबविण्यात येत असलेले मलनिःसारण प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्पातून बाहेर पडणारे पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुर्नवापर करणे, रेन वॉटर हार्वेस्टींग करुन जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे, Storm Water संदर्भाने नियोजन, शहरातील नैसर्गिक पाणी प्रवाह जपणे इत्यादी बाबी लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरासाठी पुढील 30 वर्षांकरीता स्वतंत्र जलनिती तयार केलेली आहे. नुकतेच सदरील जलनितीचे प्रकाशन दि. 17/9/2024 रोजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते करण्यात आले आहे. सदरील जलनितीचा मसुदा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या https://chhsambhajinagarmc.org या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या जलनिती बाबत आपले आक्षेप व सुचना लेखी स्वरुपात कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे कार्यालयात 60 दिवसांच्या आत दाखल करावेत असे कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांनी कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow