पाल फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...

 0
पाल फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...

पाल फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

फुलंब्री, दि.13(डि-24 न्यूज)- – फुलंब्री पोलिसांनी पाल फाटा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ३८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी दुपारी ३.५० वाजेच्या सुमारास पाल फाटा येथील बनसोड गिरणीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आरोपी पैसे लावून “झन्नामन्ना” नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार फुलंब्री पोलिसांनी कारवाई करत आरोपींकडून जुगाराचे साहित्य व मोबाईलसह रोख रक्कम जप्त केली.

या प्रकरणी किशोर दिलीप प्रधान (रा. फुलंब्री), दीपक पांडुरंग गोरे (रा. पाथरी, ता. फुलंब्री) आणि आकाश देविदास ढोकळे (रा. पाल, ता. फुलंब्री) यांच्याविरोधात गुन्हा क्रमांक २८४/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनकर भास्कर पांढरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार वक्ते करीत आहेत. ही कारवाई पोलीस स्टेशन फुलंब्रीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow