शहरात पकडला 10 लाखांचा एमडी ड्रग्स, 4 आरोपींना अटक...
शहरात पकडला 10 लाखांचा एमडी ड्रग्स, 4 आरोपी अटक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- शहर गुन्हे शाखेने एम.डी. ड्रग्स विक्री करणाऱ्या चौघांना अटक करून 10 लाख 79 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 28 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.20 वाजता नेहरू भवनजवळ, बुढीलेन परिसरात करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींकडून 49.31 ग्रॅम एम.डी. पावडर, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 10,79,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी एम.डी. ड्रग्सची खरेदी-विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपींची नावे :
सोहेल मेहमूद शेख (वय 24, रा. कपडा बाजार, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर,
सलमान मेहमूद शेख (वय 26, रा. काबाडीपुरा, बुढीलेन, छत्रपती संभाजीनगर,
अब्दुल रहमान अदनान हिलाबी (वय 26, रा. जाली दरगाह जवळ, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर,
शेख जुनैद अब्दुल रऊफ (वय 23, रा. रोशन मशिद जवळ, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 100/2026, कलम 8(c), 21(b), 29 एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. रविकांत गच्चे, पोलिस उपनिरीक्षक श्री. प्रविण वाघ, श्री. अर्जुन कदम, पोहे/योगेश गुप्ता, योगेश नवसरे, श्रीकांत काळे, विजय निकम, अशरफ सय्यद, राजेंद्र साळुंके, पोअं मनोहर गिते, राहुल बंगाळे, जालिंदर गोरे, विक्रम खंडागळे, राजेश यदमळ, अभिषेक राऊत, रोहित जाधव, प्रतीक साबळे, चापोअं सोमनाथ दुकले आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
ही कारवाई पोलिस आयुक्त श्री. प्रविण पवार, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) श्री. रत्नाकर नवले व सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) श्री. अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
What's Your Reaction?