नगरसेवक नविनसिंग ओबेरॉय यांच्या हस्ते रिक्षा स्टँडचे उद्घाटन...

 0
नगरसेवक नविनसिंग ओबेरॉय यांच्या हस्ते रिक्षा स्टँडचे उद्घाटन...

नगरसेवक नविनसिंग ओबेरॉय यांच्या हस्ते रिक्षा स्टँडचे उद्घाटन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - कटकट गेट येथील रविंद्र नगर येथे पाच रिक्षा करीता रिक्षा चालक संयुक्त संघटना महासंघाच्या रिक्षा स्टँडचे उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक नविनसिंग मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. 

याप्रसंगी मान्यवरांचे शाल व हार घालून रिक्षा स्टँडचे अध्यक्ष शेख अली सिकंदर यांनी केले.

याप्रसंगी रिक्षा चालक संयुक्त संघटना महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान, सरचिटणीस कैलास शिंदे, उपाध्यक्ष एस के खलिल, एस.के.अकील, रोशन ऑटो युनियनचे कार्याध्यक्ष नाहिद फारुकी यांची प्रमुख उपस्थिती होती. रिक्षाचालकांना मिठाईचे वाटप करुन शुभेच्छा दिल्या. नगरसेवक नविनसिंग ओबेरॉय यांनी ऑटो चालकांच्या पेट्रोल व सिएनजी गॅस मिळत नसलेल्या व शासन दरबारी प्रलंबित मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

रविंद्र नगर रिक्षा स्टँडचे अध्यक्ष शेख अली सिकंदर, शेख रफीक, आझम शेख, शेख सलमान, शेख खिझर, फैजल चाऊस, शेख अकील, युनुस पटेल, काझी शकील अहमद यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow