हेड पोस्ट ऑफिस बाॅम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल आल्याने खळबळ...
पोस्ट ऑफिस बाॅम्बने उडवण्याची धमकी, बाॅम्ब शोधक पथक व एटीएसची टिम घटनास्थळी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - जुना बाजार हेड पोस्ट ऑफिसच्या संगनकावर दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान पोस्ट ऑफिस बाॅम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली. हेड पोस्ट मास्तर सुरेश बनसोडे यांनी तात्काळ पोलीस आयुक्त कार्यालय व सिटी चौक पोलिस ठाण्याला हि माहिती दिली. मेलमध्ये पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचारी बाहेर काढून घ्यावे असे लिहिले होते म्हणून सर्व सहका-यांना तात्काळ बाहेर काढले. काही काळ कामकाज बंद करावे लागले. ग्राहकांना गैरसोय झाली म्हणून वेळ वाढवून सेवा दिली जाईल असे बनसोडे यांनी स्पष्ट केले. सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव व एटीएसची व बाॅम्ब शोधक पथक दाखल झाले. त्यांनी संगनकावर आलेला मेल बघितला. श्वानाच्या माध्यमातून बाॅम्ब शोधण्याचे काम केले असता काहीच मिळाले नाही त्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले हा मेल महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफिसला आलेला आहे. तो मेल कोठून आला याची सायबरच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. दोषींवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल.
What's Your Reaction?