पेट्रोल पंपावरील रांगांनी कोरोना काळात लागलेल्या लाॅकडाऊनच्या आठवणी ताज्या केल्या, पुन्हा लाॅकडाऊन लागणार का...?

 0
पेट्रोल पंपावरील रांगांनी कोरोना काळात लागलेल्या लाॅकडाऊनच्या आठवणी ताज्या केल्या, पुन्हा लाॅकडाऊन लागणार का...?

पेट्रोल पंपावरील रांगांनी कोरोना लाॅकडाऊनची आठवण ताजी केली, खरोखरच लाॅकडाऊन लागणार का...?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - पेट्रोल पंपावर इंधनासाठी व सिएनजी, गॅस साठी लागलेल्या लांबच लांब रांगानी नोटबंदी व कोरोना काळात लागलेल्या लाॅकडाऊनची आठवणी ताज्या केल्याने जनता पॅनिक झाली आहे. खरोखरच लाॅकडाऊन लागणार का हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी संसदेत कोरोनाहुन अधिक लाॅकडाऊनच्या तयारीत जनतेने राहावे असे आवाहन केले होते. इरान व इज्राईल युद्ध थांबत नसल्याने जगात इंधनाचे संकट आल्याने याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत आहे. युद्धामुळे कच्चे तेल व गॅसच्या दरात वाढ झाल्याने व पुरवठा कमी होत असल्याने इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने तुटवडा नसल्याचे जाहीर केले असले तरी परिस्थिती बिकट दिसत आहे. सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी अचानक गर्दी झाली. काही पेट्रोल पंप तर ड्राय झाल्याने वाहनधारक आणखी भयभीत झाले. जटवाडा रोड येथील हरणे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा दिसून आल्या. दुचाकी, कार, ऑटो चालकांनी पेट्रोल व डिझेल टाक्या भरण्यासाठी गर्दी केली होती. वाहनधारकांना विचारले असता इंधनाचे लाॅकडाऊन लागणार आहे म्हणून गाडीमध्ये इंधन भरुन घेत आहे. शहरातील सिएनजी पंपावर ऑटो रिक्षांचे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे ऑटो चालकांनी सांगितले. दुचाकीत पेट्रोल मिळाले नाही तर हातावर पोट असणाऱ्या कामगारांनी कामावर कसे जावे म्हणून अगोदरच इंधन भरुन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. हर्सुल टि पाॅईंट, दिल्ली गेट, कटकट गेट येथील पेट्रोल पंप ड्राय झाले असल्याने जेथे पेट्रोल आहे तेथे वाहनधारकांनी गर्दी केली होती. व्यवसायिक गॅस टंचाई निर्माण झाल्याने हाॅटेल चालकांच्याही व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यांना आर्थिक फटका बसत आहे. किराणा सामान, जीवनावश्यक वस्तू महाग होत आहे. इंधनाचे दर वाढल्याचा परिणाम महागाईवर होत आहे परंतु लोकांच्या आर्थिक उत्पन्न वाढत नाही तरीही महागाईचा सामना करावा लागतो आहे. पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशन चे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे की पेट्रोल डिझेलची कमतरता नाही. काही पेट्रोल पंपावर इंधन संपले तरीही पुन्हा येणार आहे. पेट्रोल पंपावर गर्दी करु नका यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. इंधन सर्वांना मिळेल अफवांवर विश्वास ठेवू नका, पॅनिक होऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow