महापालिकेची पहिल्यांदाच विक्रमी 221 कोटींची कर वसुली...

 0
महापालिकेची पहिल्यांदाच विक्रमी 221 कोटींची कर वसुली...

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची विक्रमी कर वसुली...

महापालिकेची पहिल्यांदा 221 कोटींची वसुली

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - चालू आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने कर वसुलीत विक्रमी कामगिरी करत एकूण 221 कोटी रुपयांची वसुली साध्य केली आहे. मालमत्ता कर संकलन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये मालमत्ता करापोटी 200 कोटी रुपये तसेच पाणीपट्टीपोटी 21 कोटी रुपये इतकी वसुली करण्यात आली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलन विकास नवाळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सूक्ष्म नियोजन व प्रभावी मार्गदर्शनामुळे ही विक्रमी वसुली शक्य झाली आहे.

दरम्यान, आयुक्त जी. श्रीकांत यांनी या यशाबद्दल अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त विकास नवाळे तसेच सर्व सहाय्यक आयुक्त व संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.

महानगरपालिकेच्या या कामगिरीमुळे आगामी विकासकामांना चालना मिळणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही बाब महत्त्वाची ठरणार आहे, आयुक्त म्हणाले.

याशिवाय, सदरील वसुली ही गतवर्षीच्या तुलनेत 45 टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवित असून, सुमारे 35 टक्के नागरिकांनी अधिक कर भरलेला आहे. तसेच, व्हॉट्सअॅप चॅटबॉट व ऑनलाईन कर भरण्याची सुविधा, श्रीमित्र कक्ष आणि श्रीमित्र ॲप यांच्या माध्यमातून अधिकाधिक करदात्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले असून, त्याचा सकारात्मक परिणाम वसुलीत स्पष्टपणे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow