प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ ॠषीकेश जैस्वाल यांची भव्य पदयात्रा
 
                                प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ ऋषिकेश जैस्वाल यांची भव्य पदयात्रा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)
मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ आज ऋषिकेश जैस्वाल यांनी नारळीबाग, संतोषीमातानगर, नूर कॉलनी आणि धनमंडी परिसरात एक भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला, आणि परिसरातील नागरिकांनी ऋषिकेश जैस्वाल यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. यावेळी, ऋषिकेश जैस्वाल यांनी अनेक ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यांची माहिती दिली.
पदयात्रेदरम्यान ऋषिकेश जैस्वाल यांनी प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यावर जोर दिला. त्यांनी सांगितले, "प्रदीप जैस्वाल यांनी या ५ वर्षांच्या कार्यकाळात आपल्या मतदारसंघात अभूतपूर्व विकास साधला आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती दिली आहे. रस्ते सुधारणा, ड्रेनेज सिस्टम, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्यामुळे आज आपल्याला चांगले रस्ते, स्वच्छ आणि सुरक्षित परिसर, आणि सुलभ पाणीपुरवठा मिळाला आहे." ऋषिकेश जैस्वाल यांनी यावेळी मतदारांना आवाहन करत म्हटले, "आपण प्रदीप जैस्वाल यांना एक संधी दिली होती आणि त्यांनी ती संधी योग्य प्रकारे वापरली. पुढील काळातदेखील त्यांचे नेतृत्व आपल्या परिसराला आणखी एक नवीन दिशा देईल. त्यामुळे, आगामी निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांना भरपूर मतदान द्या." पदयात्रेदरम्यान नागरिकांनी ऋषिकेश जैस्वाल यांचे भरपूर स्वागत केले. अनेक ठिकाणी, लोकांनी फुलांचे हार आणि शॉल देऊन त्यांचे अभिनंदन केले. काही ठिकाणी, रॅलीला फटाके फोडून उत्सवाचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. या पदयात्रेला माजी नगगरसेविका प्राजक्ता राजपूत, सागर करडक, पप्पू इंगळे, राहुल देवगिरीकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            