तर दिव्यांगांचा महापालिकेवर धडकणार मोर्चा...!

 0
तर दिव्यांगांचा महापालिकेवर धडकणार मोर्चा...!

तर दिव्यांगांचा महापालिकेवर धडकणार मोर्चा...

5 टक्के राखीव निधीच्या वाटपासाठी आंदोलन; महापालिका आयुक्तांना निवेदन देणार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18 (डि-24 न्यूज) :- महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या 5 टक्के निधीचे वाटप करण्यात यावे, लाभार्थ्यांना नियमित अनुदान मिळावे तसेच दिव्यांग कल्याण समितीची स्थापना करण्यात यावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी दिव्यांगांच्या विविध राजकीय पक्षांच्या सेलच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत तर मोर्चा काढण्याचा इशारा दिव्यांगांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी यांनी सांगितले 

महापालिकेकडून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा योग्य पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचा आरोप केला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अद्याप एक रुपयाही मिळालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत यापूर्वी अनेकदा महापालिकेसमोर आंदोलने करण्यात आली; मात्र मागण्यांची पूर्तता झालेली नसल्याने आता सर्व राजकीय पक्षांच्या दिव्यांग सेलने एकत्र येत आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

या मोर्चाची सुरुवात भडकलगेट येथून होणार असून, सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा महापालिकेकडे रवाना होईल. त्यानंतर महापालिका आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

याप्रसंगी आझाद समाज पार्टीच्या दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष शेख मुनीर, काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी, शहराध्यक्ष जकी मिर्झा बेग आणि वाजेद खान व विविध पदाधिकारी उपस्थित होते. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow