चोखंदळ खरेदीसाठी आता रविवार शेवटची संधी...! चला सागर रिसाॅर्टला
चोखंदळ खरेदीदारांसाठी आता रविवार शेवटची संधी...!
दर्जेदार भेटवस्तूंसाठी चला, सागर रिसॉर्टला भेट देऊ...
केंद्र शासनाच्या एमएसएमई विभागाच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद...
छत्रपती संभाजीनगर, दि. 15(डि-24 न्यूज) - देशभरातील पारंपरिक कारागिरी, आधुनिक फॅशन, गृहसजावटीच्या आकर्षक वस्तू आणि स्वदेशी उत्पादनांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘स्वदेशी एक्स्पो 2026 ’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चोखंदळ खरेदीदारांसाठी आता रविवार हा शेवटचा दिवस आहे.
सागर रिसॉर्ट, चिकलठाणा येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनात देशाच्या विविध भागांतील दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरेदीसह भारतीय कारागिरीचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी रविवारी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच छताखाली भारताच्या विविध प्रांतांतील कला, कौशल्य, फॅशन आणि उद्योजकतेचा अनुभव घेता येत आहे. देशभरातील 75 हून अधिक प्रदर्शक येथे सहभागी झाले असून, त्यामध्ये महिला उद्योजक,आदिवासी उद्योजक आणि लघुउद्योगांचा मोठा सहभाग आहे.
विविध प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल, एथनिक वेअर, ज्वेलरी, फॅशन अॅक्सेसरीज, बॅग्स, हातमाग व हस्तकला वस्तू, गृहसजावटीचे साहित्य, पर्यावरणपूरक उत्पादने तसेच आकर्षक लाईफस्टाईल वस्तू खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
या प्रदर्शनात पारंपरिक कारागिरीला आधुनिक डिझाइन आणि बाजारपेठेची जोड देण्यात आल्याने येथे नेहमीच्या बाजारपेठेपेक्षा वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण वस्तू पाहायला मिळतात.
देशाच्या विविध भागांत प्रसिद्ध असलेल्या कलाकारांनी तयार केलेली कलाकुसर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले घरसजावटीचे साहित्य, साजशृंगाराच्या वस्तू, विविध प्रांतांच्या वैशिष्ट्यपूर्ण साड्या, ज्वेलरीपासून कपडे आणि गृहपयोगी साहित्यापर्यंतची मोठी निवड हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. खरेदीसोबतच कारागिरांची मेहनत, कौशल्य आणि भारतीय परंपरेचा वारसा जवळून अनुभवण्याची संधी नागरिकांना येथे मिळत आहे.
‘स्वदेशी खरेदी, कारागिरांना साथ आणि आत्मनिर्भर भारताला हातभार’ या भावनेतून आयोजित या प्रदर्शनाला रविवार, 26 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आवडत्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी, कुटुंबीयांसाठी दर्जेदार भेटवस्तू निवडण्यासाठी आणि देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण स्वदेशी उत्पादनांचा अनुभव घेण्यासाठी रविवारची संधी दवडू नका.सागर रिसॉर्टला आवर्जून भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश विनामूल्य असून, मराठवाड्यातील नागरिकांनी या स्वदेशी उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कारागीर, महिला उद्योजक आणि छोट्या उद्योगांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असेही जिल्हा प्रशा
सनाने म्हटले आहे.
What's Your Reaction?