रोशन गेट येथील गिरणी मैदानाचे भाग्य उजळले, सोमवारपासून सपाटीकरणाचे काम सुरू होणार...

 0
रोशन गेट येथील गिरणी मैदानाचे भाग्य उजळले, सोमवारपासून सपाटीकरणाचे काम सुरू होणार...

रोशन गेट गिरणी मैदानाच्या विकासकामाला अखेर गती; सपाटीकरणाचे काम सोमवारपासून...खेळाचे मैदान बनवणार 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14 (डि-24 न्यूज) – रोशन गेट परिसरातील गिरणी मैदानाच्या विकासकामाला आता गती मिळाली आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सोमवारपासून मैदानाचे सपाटीकरण करून ते मुलांसाठी खेळण्यायोग्य आणि सुरक्षित करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

रोशन गेट आणि परिसरातील दाट लोकवस्ती लक्षात घेता, येथील मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित व योग्य जागेची मोठी गरज आहे. गिरणी मैदानाच्या विकासाचा प्रश्न विरोधी पक्षातील समीर साजिद बिल्डर, नगरसेवक उसामा अब्दुल कदीर तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील एआयएमआयएमच्या नगरसेवकांनी सातत्याने प्रशासनासमोर मांडला होता.

पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी मैदानाची सद्यस्थिती जाणून घेतली. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोमवारपासून सपाटीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच परिसरातील नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याच्या टाकीच्या कामालाही लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

गिरणी मैदान विकसित झाल्यानंतर रोशन गेट तसेच आजूबाजूच्या दाट वस्त्यांमधील मुलांना आणि युवकांना खेळण्यासाठी सुरक्षित व योग्य जागा उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, नगरसेवक उसामा सय्यद आणि प्रभागातील इतर नगरसेवकांनी नागरिकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे गिरणी मैदानाच्या विकासकामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जनतेच्या मूलभूत सुविधा, मुलांचे भवितव्य आणि परिसराचा सर्वांगीण विकास यासाठी पुढील काळातही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow