शाळा व वैद्यकीय विभागात सीएसआर अंतर्गत 1 करोड 20 लाख रुपयांचा निधी...!

 0
शाळा व वैद्यकीय विभागात सीएसआर अंतर्गत 1 करोड 20 लाख रुपयांचा निधी...!

एसबीआय कडून मनपाच्या शाळा व वैद्यकीय विभागात सीएसआर अंतर्गत एक करोड 20 लाख रुपयांचा निधी

 

रूफ टफ सोलर मुळे येणार वीजबिल शून्यावर...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने हॉटेल रामा येथे झालेल्या विभागीय परिषदेत एसबीआय कडून सीएसआर अंतर्गत 1 कोटी 20 लाखाचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. असे स्टेट बँक ऑफ इंडिया चे चेअरमन Challa Sreenivasulu Setty चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांनी सांगितले.

यामध्ये महानगरपालिकेच्या दहा शाळांमध्ये रूफ टॉप सोलर लावून देण्यात येणार असून यामुळे सर्व दहा शाळांमध्ये इलेक्ट्रिक बिल शून्य होणार आहे. यासाठी एसबीआय ने जवळपास 48 लाख रुपये निधी राखीव ठेवला आहे. व लवकरच काम सुरू होणार आहे. तसेच मनपाच्या वैद्यकीय विभागास थेलेसेमीया व सिकल सेल ॲनिमिया तपासणीसाठी चार मशीन व आठ हजार तपासणीचे किट. आणि एक सोनोग्राफी मशीन यासाठी एकूण 70 लाख देण्याचे जाहीर केले आहे.

 याप्रसंगी महानगरपालिका शिक्षण विभाग उपायुक्त श्री अंकुश पांढरे व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधीचे वितरण करण्यात आले.

मागच्या वर्षी एसबीआयने सीएससर निधी मधून महापालिकेच्या पाच शाळा सोलार रूफ टॉप करून देण्यात आल्या होत्या. या शाळांचे मागील एक वर्षापासून शून्य रुपये वीजबिल येत आहे. असे उपायुक्त अंकुश पांढरे यांनी सांगितले. 

याप्रसंगी एसबीआयचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर व 

त्रिभुवन व शहरातील व जिल्ह्यातील सर्व एसबीआय मॅनेजर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow