शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री संजय शिरसाट

 0
शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री संजय शिरसाट

36 मीटर मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर मशीनचे लोकार्पण; शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री संजय शिरसाट...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत, शहराचे नाव उंचावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

जिल्हा नियोजन समिती (DPDC) मार्फत प्राप्त निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट मशीनचे लोकार्पण आज सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालय येथे संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री शिरसाट पुढे म्हणाले की, नवीन डीपीडीसीआर कायद्यांतर्गत उंच इमारतींना परवानगी दिली जात असल्याने, अशा इमारतींमध्ये आग लागल्यास नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आवश्यक आहे. याच विचारातून सदर मशीन खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला.

तसेच, विकसित होत असलेल्या झूलॉजिकल पार्कसाठी अतिरिक्त 17 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, महानगरपालिकेला गावठाण जमीन मिळावी यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर, त्याच महापालिकेच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महापौर श्री समीर राजूरकर यांनी मनोगत व्यक्त करताना, सदर यंत्रसामग्रीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले. नवीन डीपीडीसीआर कायद्यामुळे उंच इमारती वाढणार असून, अशा वेळी ही यंत्रणा अग्निशमन दलासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. तसेच गुंठेवारी भागातील अरुंद रस्त्यांवर पोहोचू शकतील अशी लहान अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.

उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी अग्निशमन वाहन पुरवठादार संस्थांना सूचना देताना, वाहनांची गती मर्यादा (स्पीड लॉक) ठेवू नये, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी तत्काळ पोहोचणे शक्य होईल, असे सांगितले.

महानगरपालिका आयुक्त श्री अमोल येडगे यांनी सांगितले की, भविष्यात शहरात उंच इमारतींची संख्या वाढणार असून, या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आग नियंत्रणास मदत होईल तसेच अग्निशामकांच्या जीविताचा धोका कमी होईल.

या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते श्री अब्दुल समीर साजिद, गटनेते श्री किशोर नागरे (शिंदे सेना), श्री हाजी शेरखान (AIMIM), नगरसेविका श्रीमती कीर्ती शिंदे, कुमारी हर्षदा शिरसाट, श्रीमती अनिता मानकापे, तसेच सदस्य श्री रशीद खान, श्री सचिन खैरे, श्री अब्दुल मतीन खान आदींसह महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री रणजीत पाटील, श्रीमती कल्पिता पिंपळे, मुख्य वित्त व लेखाधिकारी श्री संतोष वाहुळे, शहर अभियंता श्री संजय कोंबडे, उपआयुक्त श्री अंकुश पांढरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) श्री अमोल कुलकर्णी, श्री वसंत भोय, श्री संजय गोरे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी...

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडे बहुमजली इमारतींना अग्निसुरक्षा पुरविण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे पालकमंत्री श्री संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीद्वारे महानगरपालिकेला रु. 15,78,78,000/- कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून महानगरपालिकेने 36 मीटर उंचीचे मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट खरेदी केला आहे. या मशिनरीच्या सेट मध्ये 36 मीटर उंचीचे 01 वॉटर टॉवर, 14000 लिटर क्षमतेचे 01 वॉटर बाउझर व 01 रोबोट ही अत्याधुनिक यंत्रणा आहे. सदरील आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर हे जर्मन टेक्नॉलॉजीचे असून, "स्विंग" या जर्मन कंपनीचे भारतातील व्यावसायिक भागीदार मे. निधी एंटरप्रायझेस, मुंबई यांनी मशिनरीचा पुरवठा केला आहे.

या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर द्वारे 10 ते 12 मजली इमारतींना अग्निसुरक्षा पुरविणे शक्य होणार आहे. वॉटर टॉवरच्या बुमला थर्मल मॉनिटरिंग कॅमेरा व फायर फायटिंग मॉनिटर असून, कॅमेराद्वारे बहुमजली इमारतीवर लागलेली आग वाहनाच्या स्क्रीनवर दिसते. मशिनरीचा ऑपरेटर वाहनाच्या कंट्रोल पॅनलद्वारे थर्मल कॅमेराच्या मदतीने तळमजल्यावरून आगीवर नियंत्रण मिळवू शकतो, त्यासाठी फायरमनला प्रत्यक्ष आगीच्या जवळ जाण्याची आवश्यकता पडत नाही. वॉटर टॉवर यंत्रणेला वॉटर बाउझर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट मधील रोबोटद्वारे फायरमनला आगीच्या जवळ न जाता तळमजल्यावरील आग विझविणे शक्य होणार आहे. उत्पादक कंपनीकडून सदरील यंत्रणा नुकतीच महानगरपालिकेला प्राप्त झाली असून, लोकार्पण व उचित प्रशिक्षणानंतर या मशिनरीचा प्रत्यक्ष वापर सुरु करण्या

त येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow