स्मार्ट सिटी बस डेपोच्या कामामुळे थांबला पाण्याचा प्रवाह, आसपासच्या घरात घुसले पाणी
स्मार्ट सिटी बस डेपोच्या कामामुळे थांबला पाण्याचा प्रवाह, घरात घुसले पाणी ....!
छ.संभाजीनगर(डि-24 न्यूज) शहरातील सुरेवाडी वार्ड क्रं 8 गोकुळनगर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत (जाधववाडी ) येथे सुरू असलेल्या बस डेपोच्या कामामुळे नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात गोकुळनगर येथे थांबले आहे. येथील दोन गल्ल्यांमध्ये ब-याच नागरीकांच्या घरात रात्रीच्या पावसामुळे पाणी गेले आहे. तसेच वसंतनगर व गोकुळनगर या भागातील नागरिकांची रहदारी बंद झाली आहे. हे पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित पाणी तुंबलेल्या ठिकाणी महानगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन जवानांनी भरपूर प्रयत्न करून सुद्धा स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळे पाण्याचा प्रवाह काढता आला नाही त्यामुळे परत पाऊस आल्यास फार मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान होईल. यावेळी माजी नगरसेवक सीताराम सुरे, शिवसेना उपशहरप्रमख रमेश सुर्यवंशी, अग्निशमन दलाचे श्री.पवार, राहूल कुबेर,बापू लोखंडे यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?