राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दुस-या यादीत 14 उमेदवार...
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून महानगरपालिका निवडणूक 2026 साठी अधिकृत उमेदवारांची द्वितीय यादी जाहीर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26 (डि-24 न्यूज) – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे प्रभागनिहाय अधिकृत उमेदवारांची द्वितीय यादी आज जाहीर करण्यात आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी ही यादी प्रसिद्धीस दिली.
जाहीर झालेल्या द्वितीय यादीमध्ये शहरातील विविध प्रभागांतील अनुभवी व कार्यक्षम उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून, पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार या यादीतून व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) – अधिकृत उमेदवारांची द्वितीय यादी :
अ.क्र. उमेदवाराचे नाव प्रभाग क्र.
प्रभाग 2 सुरेखा सुंदर खरात,
प्रभाग 2 शेख इरफान शेख अफसर, प्रभाग 2 परवीन इप्तेकार पठाण, प्रभाग 8 लता प्रकाश गायकवाड, प्रभाग 12 रहिमा बेगम गफुर खान,
प्रभाग 12 हमीद रशीद सय्यद,
प्रभाग 13 सलीम शमशेर पटेल ,
प्रभाग 23 बाळु नाना शिंदे,
प्रभाग 24 पवन हिरामण हिवराळे, प्रभाग 24 प्रियंका प्रशांत कु-हे, प्रभाग 24 लक्ष्मीबाई बबनराव जगताप,
प्रभाग 24 संतोष सूर्यभान शिंदे, प्रभाग 25 कोमल कल्याणराव रंधे, प्रभाग 25 अयान छोटु पटेल.
शहर जिल्हाध्यक्ष अभिजित भास्करराव देशमुख यांनी सांगितले की, “पक्षाच्या निष्ठावंत, कार्यक्षम आणि जनतेशी थेट संपर्क असलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दमदार कामगिरी करेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
या द्वितीय यादीमुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
What's Your Reaction?