आमदार जयस्वाल यांच्या हस्ते बुलेट ट्रेनचे उद्घाटन...!

 0
आमदार जयस्वाल यांच्या हस्ते बुलेट ट्रेनचे उद्घाटन...!

आमदार जयस्वाल यांच्याहस्ते मिनी बुलेट ट्रेनचे उदघाटन... 

छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.18(डि-24 न्यूज) टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यान येथे मिनी बुलेट ट्रेनचे उद्घाटन आमदार (मध्य) श्री प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल आणि छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासकी जी श्रीकांत यांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ट्रेनमध्ये बसून त्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री जयस्वाल यांनी प्रशासक जी श्रीकांत यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.

 श्रीकांत या शहराला पुढच्या दोन वर्षात कुठचा कुठे घेऊन जाणार आहे ही बाब लोकांना लवकरच कळेल, ते म्हणाले. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पचे उद्घाटन झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की बाहेर देशात प्रत्येक शहरात मध्य भागी एक सेंट्रल पार्क असते. हीच संकल्पनावर आपण शहराचा मधोमध असलेले स्वामी विवेकानंद उद्यान व परिसर ज्याचे क्षेत्रफळ एकूण 24 एकर आहे या जागेवर सेंट्रल पार्क, एडवेंचर पार्क, गलो गार्डन, पेट पार्क आणि जनावरांसाठी स्मशानभूमी याचे नियोजन केले आहे याच्या पहिल्या टप्पा म्हणून आपण आज मिनी बुलेट ट्रेन चे उद्घाटन केले आहे.

 यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, संतोष वाहुळे, कार्यकारी अभियंता आर एन संधा, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना विजय पाटील यांनी मांडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow