विटखेडा ते वाल्मि रोडवरील अतिक्रमण काढले

 0
विटखेडा ते वाल्मि रोडवरील अतिक्रमण काढले

विटखेडा ते वाल्मि रोड वरील 85 ते 90 अतिक्रमणे काढली

महानगरपालिकेची धडक कारवाई...

छ. संभाजीनगर(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने शहरात व मनपा हद्दीत अतिक्रमण कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

आज महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने विटखेडा ते वाल्मी रस्त्यावरील जवळपास 85 ते 90 लहान मोठे अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. विटखेडा ते कांचनवाडी रोडवरील अतिक्रमणामुळे तसेच रस्त्याचे चौपदरीकरणचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता यामुळे नागरिकांना येणे जाणे करता अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे सदर अतिक्रमणे निष्कषित करण्यात अनिवार्य झाले होते.

या परिसरातील अतिक्रमण धारकांना मागील एक महिन्यापासून अतिक्रमण पथकाद्वारे संबंधित अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण स्वतः हुन काढून घेण्यासाठी वारंवार सूचना देण्यात येत होत्या.

परंतु अद्याप पर्यंत अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण न काढल्यामुळे आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोखंडी शेड, टपरी व इतर लहान मोठे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. सकाळी 10 वाजेपासून सदर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी काही अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन आपले अतिक्रमण काढल्यामुळे त्यांचे कोणतेही सामानास नुकसान झाले नाही. उर्वरित अतिक्रमण जेसीबी च्या साह्याने निष्कासित करण्यात आले. त्यापैकी एक टपरी जप्त करण्यात आली तसेच किरकोळ सामान जप्त करण्यात आले. साय.6 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. उद्या सकाळ पासून उर्वरित कारवाई केली जाणार आहे.

सदर कारवाई उप आयुक्त 1 सविता सोनवणे, पद निर्देशित अधिकारी झोन क्र.10 कैलास जाधव ,इमारत निरीक्षक मजहर अली, सागर श्रेष्ठ व कर्मचारी यांनी पार पाडली.

 जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण कारवाई वेळी त्या ठिकाणी असलेल्या सामानाचे नुकसान होत असल्यामुळे अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण व या ठिकाणी असलेले सामान स्वतः काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका यास जबाबदार राहणार नाही असे आवाहन अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्या

त आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow