नीट परीक्षेत झालेल्या घोळावर युवक काँग्रेस अक्रामक, क्रांतीचौकात केली निदर्शने...!

 0
नीट परीक्षेत झालेल्या घोळावर युवक काँग्रेस अक्रामक, क्रांतीचौकात केली निदर्शने...!

नीट परीक्षेत झालेल्या घोळावर युवक काँग्रेस अक्रामक, क्रांतीचौकात केली निदर्शने...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.18(डि-24 न्यूज)

जिल्हा युवक काँग्रेस क्रांती चौक येथे जिल्हा युवक काँग्रेस तर्फे वैद्यकीय पूर्व परीक्षा (NEET) परीक्षेत मध्ये देशभरात प्रचंड गैर व्यवहार झाला आहे. याचा निषेध म्हणून जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास विलास औताडे, महाराष्ट्र सचिव डॉ. निलेश अंबेवाडीकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थी व पालकांनी जोरदार निदर्शने केली.

यावेळी NTA संस्था रद्द करून CBSC मार्फत परीक्षा घ्यावी, दोषींची CBI मार्फत चौकशी करून कठोर कार्यवाही करावी, जाहीर झालेल्या निकालाची पुनर्तपासणी करावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. 

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये शहर जिल्हा अध्यक्ष युसूफ शेख, माजी शहराध्यक्ष सय्यद अक्रम, इकबाल सिंग गिल, खालेद पठाण, अरुण शिरसाठ, अनिस पटेल, सागर साळुंखे, राहुल संत, मसरूर सोहेल खान, आमेर अब्दुल सलीम, संजय धर्मरक्षक, विकास घाल, इरफान खान, विजय कांबळे, गुरमित सिंग गिल, कौसर बाबा, आकाश रगडे, मयूर साठे, विनोद उंटवाल आदी पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow