आंबेडकरवादी संघर्ष समितीने काढला "शांती मार्च"...!

 0
आंबेडकरवादी संघर्ष समितीने काढला "शांती मार्च"...!

आंबेडकरवादी संघर्ष समितीने काढला "शांती मार्च"....

भडकलगेट ते महापालिकेच्या मुख्यालयावर विविध मागणीसाठी काढला मार्च...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.18(डि-24 न्यूज) आंबेडकरी समाजाच्या विविध मागणीसाठी आज दुपारी भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंबेडकरवादी संघर्ष समितीने काढला शांती मार्च. हा मार्च महापालिकेच्या मुख्यालयावर काढण्यात आला. संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

हर्सुल टी पाॅईंट येथे गौतम बुद्धांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा. रेल्वे स्टेशन येथे अशोक सम्राट यांचा पुतळा उभारण्यात यावा. संत रविदास महाराज यांचा पुतळा चिकलठाणा विमानतळासमोरील चौकात बसविण्यात यावी. मिल काॅर्नर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवावी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे. मनपा प्रशासन व आयुक्त कार्यालय व इतर दालनामध्ये लावलेल्या मनपा बोध चिन्हावरील कमळाचे चिन्ह काढण्यात यावे. रमाई आवास योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करावी. विना स्थळ पाहणी मंजूर केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. महागाई निर्देशांकांनुसार रमाई आवास योजनेचा निधी दहा लाख करण्यात यावा. या योजनेचा ख-या गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. गुंठेवारी व अघोषित झोपडपट्टी क्षेत्रामध्ये रमाई आवास योजना लागू करण्यात यावी. गुंठेवारी वसाहतीमधील घरे नियमित करण्यासाठी आकारलेल्या रकमेची तीन हप्त्यांमध्ये सवलत देण्यात यावी. उस्मानपुरा येथे आनंद गाडे चौक ते मिलिंदनगर मार्गे रेल्वे गेट पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. भिमनगर, भावसिंगपूरा येथे 15 व 30 मिटर रस्त्याचे काम मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तात्काळ सुरू करण्यात यावे. शहरातील व उस्मानपुरा आनंद गाडे चौक ते देवगिरी महाविद्यालयादरम्यान असलेले कच-याचे ढिगार काढण्यात यावे. मुकुंदनगर(मुकुंदवाडी) येथील ड्रेनिजच्या चेंबरमध्ये खड्ड्यात पडून मृत्यू पावलेल्या नागेश गायकवाड यांच्या कुटुंबीयास आर्थिक दहा लाखांची मदत करुन कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घ्यावे. शहरातील मनपा हद्दीतील ग्रिन बेल्ट मधील घरे पाडू नये. मनपा सिबीएसई पॅटर्न शाळेत विद्यार्थी संख्या 30 वरुन 100 करावी. त्या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण द्यावे. सिडको, एन-६ , संभाजी काॅलनीतील महापालिकेने भाडेतत्त्वावर 40 वर्षांपासून दिलेल्या जुन्या शाळेचे बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे. शाळा व्यवस्थापनाकडे थकीत 1,31,51,808 रुपये तात्काळ वसूल करण्यात यावे. हि मागणी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी रामराव दाभाडे, नानासाहेब शिंदे, मोहनलाल गोरमे, मिलिंद मोकळे, किशोर गडकर, बाळूभाऊ वाघमारे, संतोष मोकळे, राहुल वडमारे, भिमराव गाडेकर, विनोद कासारे, संजय जाटवे, अरुण खरात, आकाश ढिलपे, आदीत्य खरात, मधुकर ठोंबरे, मनिष नरवडे, भाई मिलिंद दाभाडे, मधुकर त्रिभुवन, भाई एस.एस.जमधडे, उत्तम जाधव, नायबराव दाभाडे, अशोक सोनवणे, सुरेश गायकवाड, सुनिल अंभोरे, सुनील अवचरमल, बाळू मगरे, प्रकाश घोरपडे, एड डी.व्हि.खिल्लारे, राजु म्हस्के, मेजर रमेश खरात, भिमराव बर्डे, राजु त्रिभुवन, अंकुश शिंदे, प्रमोद मगरे, ज्ञानेश्वर खरात, जयनाथ बोर्डे, संगिता ताई जाधव, जया गजभिये, छायाताई मेश्राम आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow