तापमान कमी करण्यासाठी करा वृक्षारोपण, शहरातील डॉक्टरांच्या टिमने केले शहरात वृक्षारोपण
तापमान कमी करण्यासाठी करा वृक्षारोपण, शहरातील डॉक्टरांच्या टिमने केले शहरात वृक्षारोपण
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.24(डि-24 न्यूज) पृथ्वीवर ग्लोबल वार्मिंगने तापमानात वाढ होताना दिसत आहे. पाऊस कमी पडत आहे. ऑक्सिजनची कमी होत असल्याने विविध आजार वाढत आहे यासाठी एकच पर्याय आहे वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन केले तर येणाऱ्या पिढीला वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार नाही. शहरातील डॉक्टरांची टिम वृक्षारोपण करण्यासाठी पुढे आली आहे. ग्रीन अर्थ संस्था व युनायटेड मेडीकोज असोसिएशन(UMA) च्या वतीने किलेअर्क, नौबत दरवाजा येथील पंचकुवा कब्रस्तानात लिंबाचे व बोरीचे 25 झाडे लावण्यात आली. अशी माहिती डॉ. सरताज पठाण यांनी दिली आहे. त्यांनी शहरातील नागरिकांना एक झाड तरी लावा असे आवाहन केले आहे. तापमानात वाढ होत असल्याने मानव जातीचे व जनावरांचे मृत्यूच्या घटना वाढत आहेत हे कमी करण्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी पुढे यावे. हज यात्रेत सुध्दा तापमान वाढ झाल्याने मृत्यूची घटना घडली. शहरातील खुले मैदान, गार्डन, शाळा, काॅलेजच्या मैदानावर वृक्षारोपण करण्याचा आमच्या टिमने संकल्प केला आहे.
यावेळी डॉ. अल्ताफ कुरेशी, डॉ. नुसरत फारुकी, डॉ.मोहंमद शफी, डॉ.हाश्मी, डॉ.मो.जियाओद्दीन, डॉ.अब्दुल हादी, डॉ.मुजीब सय्यद, डॉ.आसिम मोहम्मद बादाम, अज्जू लिडर आदी उपस्थित होते
.
What's Your Reaction?