दिवंगत क्रीकेटरच्या आठवणी जागवण्यासाठी रक्तदान शिबीर

 0
दिवंगत क्रीकेटरच्या आठवणी जागवण्यासाठी रक्तदान शिबीर

दिवंगत क्रीकेटरच्या आठवणी जागवण्यासाठी रक्तदान शिबीर

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.25(डि-24 न्यूज) शहरातील दिवंगत क्रीकेट कोच शेख हबीब व प्रसिद्ध क्रीकेटपटू इम्रान पटेल यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या आठवणी ताज्या राहावे यासाठी भडकलगेट येथे त्यांच्या चाहत्यांनी इगल फ्रेंडस ग्रुपच्या वतीने मौलाना आझाद वुमन कॉलेज, नौखंडा परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले व रक्तदान करण्याचे युवकांना आवाहन करत रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचे सांगितले त्यांचे सोबत डॉ. शादाब शेख हे होते. ग्रुपचे शेख अक्रम यांनी त्यांचे स्वागत केले. 

याप्रसंगी शासकीय रक्तपिढी, घाटी रुग्णालय यांनी रक्तसंकलन केले. यावेळी 110 युवकांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शेख इसरार, शेख आरीफ, शादाब शेख, इम्रान खान, सुफीयान खान, सय्यद मुजफ्फर, शेख अशरफ, शेख समीर यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow