मनसैनिकांची पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत, जालना, बीड जिल्ह्यात पाठवली मदत...

 0
मनसैनिकांची पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत, जालना, बीड जिल्ह्यात पाठवली मदत...

मनसैनिकांची पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत, जालना, बीड जिल्ह्यात पाठवली मदत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)- मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे हवालदिल झाले. पिकांचे, जनावरांचे, घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनसैनिक धावून गेले. जालना व बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांतील गरजू शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापनाच्या वतीने तांदुळ सेवा वाटप करण्यात आली. शेतकरी संकटात सापडला असताना मनसैनिकांनी छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा महाराष्ट्र उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या कार्यालयातून 51 कट्टे तांदुळाचा ट्रक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रवाना करण्यात आला. जिल्हा संघटक अशोक पाटील पवार यांच्या पुढाकाराने हि सेवा शेतकऱ्यांची करण्यात प्रयत्न केला.

अंबड तालुक्यातील गोंदी पाथरवाला बुद्रुक व बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव या दोन गावातील शेतकऱ्यांना तांदुळाचे कट्टे वाटप करण्यात आले. 

या सेवा कार्यात राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना, छत्रपती संभाजीनगर, अशोक कराळे पाटील, उपजिल्हा संघटक, प्रदीप कापसे पाटील फुलंब्री तालूका सहसचिव, बद्री जाधव पाटील, शहर सहसचिव, रोहीत पवार पाटील, शहर सहसचिव, मुकेश मालोदे रत्नपुर(खुलताबाद) तालूका सहसचिव, विठ्ठल बनकर, फुलंब्री, जिल्हा परिषद सर्कल, रुपेश शिंदे, शहर उपाध्यक्ष, नुतन ताई जैस्वाल, रविंद्र गायकवाड, विभाग अध्यक्ष, अमित जैस्वाल, शहर उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow