ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मला निवडून द्या - राजू शिंदे

 0
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मला निवडून द्या - राजू शिंदे

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मला निवडून द्या - राजू शिंदे 

पडेगाव, मिटमीटा, साजापूर येथील कॉर्नर बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

महाविकास आघाडीचे उमेदवार राजु शिंदे यांचा पदयात्रा, प्रचार फेरी, कॉर्नर बैठकातून प्रचार शिगेल

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) गेली 15 वर्ष तुम्ही ज्यांना आमदार केलं. त्यांनी मात्र या भागात डोकुन सुद्धा पाहिलं नाही. ग्रामीण भागात अजून पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय झाली नाही. रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, हॉस्पिटल आणि बेरोजगारी आदी समस्यांना सोडण्यात ते अपयशी ठरले. त्यांनी केवळ आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उध्दव ठाकरे साहेबांना धोका देऊन 50 खोके घेऊन आपलाच विकास केला. असा आरोप करून मी तुमचे स्वप्न साकार करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करेल, अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार राजु शिंदे यांनी दिली.

ते पडेगाव, मिटमीटा, साजापूर येथील कॉर्नर बैठकीला संबोधित करत होते. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, कारभारी भुजबळ, तिसगाव ग्रामपंचायत चे सदस्य नागेश पठारे, अलीम भाई, राजु पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना राजु शिंदे म्हणाले, की माझी लढाई ही धनशक्ती विरोधात आहे. आताची निवडणूक जनतेने मनावर घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपलाच विजय होणार असला तरी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गाफील राहू नये. एक एक मत मशाल चिन्हावर कसं होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले. साजापूर येथे राजू पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी मशाल चिन्हावर मतदान करून घेण्याचे आवाहन केले. राजु भाऊ शिंदे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. सर्वांच्या सुखा दुःखात धावून येणारा आहे. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहणे आवश्यक आहे. घरोघरी मशाल पोहचून राजु शिंदे यांना या भागाचा विकास करण्यासाठी विधान सभेवर पाठवायचे. असे आवाहन करण्यात आले.

चौकट 

महाविकास आघाडीचे उमेदवार राजु शिंदे यांनी श्री 1008 चिन्तामणि पार्श्वनाथ दिगम्बर जैन अतिशय क्षेत्र, कचनेर, छत्रपती संभाजी नगर येथे शुक्रवारी रात्री उशिरा जाऊन मनोभावे दर्शन घेतले. या विधान सभेच्या निवडणुकीत आपला विजय व्हावा, असे साकडे घातले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow