सुजान नागरीकांना पोलिस आयुक्तांचे नम्र आवाहन...!

 0
सुजान नागरीकांना पोलिस आयुक्तांचे नम्र आवाहन...!

सुजान नागरीकांना पोलिस आयुक्तांचे नम्र आवाहन...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.28(डि-24 न्यूज) पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या अभिनव संकल्पनेतून औरंगाबाद शहर पोलिस दलामध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक शाखा स्थापन करण्यात आली असून शहरात अमली पदार्थ विरोधी कडक कारवाई करण्याचे सक्त आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहे.

नमूद शाखेकडे 9529019061 हा मोबाईल क्रमांक दिला असून ह्यावर नागरिक whatsapp msg किंवा call, text, msg करुन अमली पदार्थ विकणारे, पुरवणारे इसमांबाबत माहिती देवू शकतात, माहिती देणा-या व्यक्तीचे नाव, नंबर अत्यंत गोपनीय राहिलं. ह्या क्रमांकावर येणाऱ्या माहिती बाबत स्थानिक पोलीस, विशेष पोलीस पथक, गुन्हे शाखा, ANC सेल यांच्या स्तरावर कार्यवाही घेतली जाईल. त्याबाबत थेट रिपोर्टिंग पोलिस आयुक्तांना करण्यात येत आहे असे आवाहन शहरातील सुज्ञ नागरीकांना अमली पदार्थ प्रतिबंधक शाखा, औरंगाबाद, पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow