3 मार्च रोजी देशात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम, मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांचे आवाहन

 0
3 मार्च रोजी देशात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम, मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांचे आवाहन

3 मार्च रोजी देशात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम...0 ते 5 वयोगटातील मुलांना पाजा डोस....

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) केंद्र व राज्य शासनाच्या आदेशा नुसार दि 03 मार्च 2024 रोजी पल्स् पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे.

0 ते 5 वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस पाजावे असे आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी आज केले आहे.

त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले मनपा कार्यक्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील 1,98,910 मुलांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शासनामार्फत 250000 पोलिओ डोस प्राप्त झाले असून प्रत्येक आरोग्य केंद्रनिहाय आवश्यकतेनुसार वाटप करण्यात आले आहे. 41 रिर्पोटिंग युनिटच्या अंतर्गत एकूण 689 पोलिओ बुथ ठेवण्यात आलेले आहे. या ठिकाणी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. यापूर्वी कितीही डोस दिले असले तरी बाळ नुकतेचे जन्माला आलेले असले तरीही किरकोळ आजारी असले तरीही दि. 3 मार्च 2024 रोजी पोलिओ डोस देणे गरजेचे आहे. यासाठी वैदयकीय अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर व नर्सिंग स्टाफ, अंगणवाडी स्टाफ, अंगणवाडी आशा व इतर असे एकुण 3624 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत.

तसेच या मोहिमेत रेल्वेस्टेशन, बसस्थानक, विमानतळ, टोलनाके, मॉल्स, जकातनाके अशा 125 ठिकाणी बालकांना डोस पाजण्यासाठी ट्रांझीट टिमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 22 मोबाईल टिम द्वारे स्थलांतरीत व विटभट्टया बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी, तांडे, वस्त्या, याठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

दि. 24-02-2024 रोजीच्या टास्क फोर्स बैठकीत आयुक्त् यांनी दि. 03 मार्च 2024 रोजी सिद्धार्थ गार्डन येथे निशुल्क प्रवेश घोषित केला आहे. तसेच सकाळी कचरा संकलनावेळी गल्ली गल्लीत घंटागाडीवर पोलिओ झिंगल्स वाजविणे सुरु झाले. सिद्धार्थ गार्डन व मध्यवर्ती बसस्थानक येथेही पोलिओ झिंगल वाजविणे सुरु झाले आहे. सर्व मॉल्स व स्मार्ट सिटीचे डिजीटल स्क्रिनवर आठ दिवसांपासून पोलिओच्या व्हिडीओचे क्लिप दाखविण्यात येत आहे. प्रोझोन मॉलमध्ये पल्स पोलिओ मोहीमेच्या जागोजागी स्टैंडी लावून जनजागृती करण्यात येत आहे.

तसेब युनिसेफ व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या मार्फत शहरात पल्स

पोलिओची जनजागृती होण्यासाठी प्रत्येकी पाच होर्डिंग्ज देण्यात आले असून सदर होर्डिंग्ज शहराच्या गर्दीच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका आरोग्य विभागा अंतर्गत 40 आरोग्य केंद्र येथेही बुथनिहाय पोस्टर्स व बॅनर्स वितरीत करुन जनजागृती करण्यात येत आहे व शहरातील सर्व मस्जिद मधूनही उर्दु परिपत्रकाद्वारे मोहीमेची जनजागृती सुरु आहे. शिक्षण विभागाच्या सहभागातून शाळेतून 02 मार्च 2024 रोजी जनजागृतीसाठी पोलिओ रॅली काढण्यात येणार आहे. तरी 0 ते 5 वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस पाजवून घेण्याबाबतचे आवाहन डॉ. पारस

मंडलेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग महानगरपालिका तर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow