खंडणीसाठी चक्क कारचालकाचे अपहरण, दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

 0
खंडणीसाठी चक्क कारचालकाचे अपहरण, दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

खंडणीसाठी चक्क कारचालकाचे अपहरण, दोघांना गुन्हे शाखेकडून अटक...

अपहरण झालेल्या कारचालकाची पोलिसांनी केली सुटका

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) सोलापूरला जाण्यासाठी कार बुक करून खंडणीसाठी कारचालकाचे अपहरण करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी डि-24 न्यूजला कळविले आहे. सुनील लक्ष्मण गवळी, वय 40, राहणार धनंजय वस्ती, सर्व्हिस ज्ञान कॉलनी, कोथरूड, पुणे आणि शरद मोहन पंडित, वय 38, राहणार गेवराई, जिल्हा. बीड, ह. मु. मानस थयरी सरोवर, त्ता. हवेली, जी. पुणे) असे कारचालकाचे अपहरण करणाऱ्या दोघांची नावे असल्याचे पोलीस निरीक्षक गुरमे यांनी सांगितले.

सविस्तर घटना अशी पूणे येथून सोलापूरला जाण्यासाठी दोन जणांनी डीजे ॲपवरून टॅक्सी बुक केली होती. त्यानंतर दोघांनी कारचालकाचे अपहरण करून त्याच्या बँक खात्यावरून 10 हजार रुपये एटीएम वरून काढून घेतले होते. या प्रकरणी पूणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूणे येथून कार चालकाचे अपहरण करणारे दोघे जण सिडको बस स्थानक परिसरात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप साळुंखे, जमादार संजय मुळे, संजय गावंडे, अमोल शिंदे, नवनाथ खांडेकर, सुनील बेलकर, तातेराव शिंगारे, श्याम आडे, अजय दहिवाळ आदींच्या पथकाने सिडको बस स्थानक परिसरात सापळा रचून सुनील गवळी आणि शरद पंडित या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी कार क्र. MH-12, SF-2485 च्या कारचालकाचे पैशासाठी अपहरण केले असल्याची कबुली दिली. पोलीसांनी दोघांच्या ताब्यातून अपहरण झालेल्या कारचालकाची सुटका केली असल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी डि-24 न्यूजला सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow