काँग्रेस कार्यकारिणी जाहीर होताच लागले ग्रहण, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा

 0
काँग्रेस कार्यकारिणी जाहीर होताच लागले ग्रहण, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा

काँग्रेस कार्यकारिणीत निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, यादी बदलल्याची चर्चा

यादीत छत्रपतीसंभाजी नगर लिहिल्याने नाराजी... वरिष्ठ नेत्यांनी दिलेली नावे कार्यकारिणीत आहे का...? सोशल मीडियावर सुध्दा चर्चा गरम होताना दिसत आहे...आरोप प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे...

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) कालच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर झाली त्यापासून नाराजी नाट्य सुरू झाले आहे. एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कार्यकारिणीत पदे दिलेले अनेक जण हे कधीही गांधी भवनची पायरी सुध्दा चढली नाही. कधी आंदोलनात सहभागी झाले नाही. शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे मोलाची कामगिरी करणाऱ्यास प्रवक्ते पदावरून या कार्यकारिणीत दूर करण्यात आले असेही त्या निष्ठावंत कार्यकर्त्याने सांगितले. गेली 20 ते 22 वर्षांपासून काँग्रेसमध्ये निष्ठेने पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. पाच शहराध्यक्षांच्या सोबत काम केले. मागिल कार्यकारिणीत शहर सरचिटणीस पदावर असताना या यादीतून नाव वगळण्यात आले. यामुळे काही नाराज कार्यकर्त्यांनी थेट मुंबई गाठत प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेऊन तक्रार करण्यासाठी गेले अशीही माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पक्षांशी संबंध नसलेले काँग्रेस पक्षाच्या विचारधारा ज्यांना माहीत नाही अशा काही जणांना पदे देण्यात आली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत याचा फटका बसणार अशीही चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. यादीमध्ये औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर छापलेले होते म्हणून एका गटात तुफान नाराजी असल्याचे बोलले जात आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीची 11 ऑक्टोबर रोजी प्रदेश सरचिटणीस प्रवीण मोरे यांच्या सहीची यादी बदलण्यात आली त्यामधून काही निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांची नावे वगळून 17 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये जे वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाच्या विचारधारा व आंदोलनात हिरीरीने सहभाग घेणा-यांचा पत्ता कट करण्यात आला असल्याचीही चर्चा आहे.

अगोदरच शहरात काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे आवाहन आहे. एकीकडे अल्पसंख्याक समाज शहराच्या नामांतरावराच्या मुद्यावरून नाराज झाले आहे. अगोदरच प्रभारी अध्यक्ष आणि AICC ची या कार्यकारिणीला मान्यता आहे का...? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एमआयएम पक्षाचेही व विविध पक्षांचे सुध्दा आव्हान असताना कार्यकारिणी जाहीर होताच ग्रहण लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow