लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचाच विजय होणार - काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख

 0
लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचाच विजय होणार - काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख

चंद्रकांत खैरे विजयी होणार - काँग्रेस शहराध्यक्ष युसुफ शेख

काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्या निवासस्थानी भेट....

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे लोकसभा निवडणुकीत विजयी होतील. खैरेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसुफ शेख यांनी केले आहे.

आज दुपारी चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. लोकसभेत महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास जातीय सलोखा बिघडेल. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन खैरे काम करतात. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी लोकसभेत पाठविण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

ते जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. 

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, एड एकबालसिंग गिल, अनिस पटेल, आकेफ रजवी, डॉ.अरुण सिरसाठ, उमाकांत खोतकर, संतोष भिंगारे, संजय धर्मरक्षक, डॉ.निलेश अंबेवाडीकर, गौरव जैस्वाल, सुरेखा पानकडे, मिनाक्षी देशपांडे, अनिता भंडारी, मंजु लोखंडे, सरोज जेकब, अरुणा लांडगे, परवीन देशमुख, असमत खान, कैसर बाबा, शकुंतला साबळे, शेख रईस, प्रमोद सदाशिव, रवि लोखंडे, शफीक शहा, इरफान पठाण, मुदस्सर अन्सारी, नदीम सौदागर, विनायक सरवदे, जकी शेख, फेरोज पठाण, मुबीन शेख, उत्तम दनके, चक्रधर मगरे, यादव, अहिरे, रवि लोखंडे, मुजंमील शेख, बरखा विंचुरे, सुनील साळवे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow