इम्तियाज जलील व सुजात आंबेडकर आमनेसामने, इम्तियाज जलील फिरले माघारी...!

 0
इम्तियाज जलील व सुजात आंबेडकर आमनेसामने, इम्तियाज जलील फिरले माघारी...!

इम्तियाज जलील - सुजात आंबेडकर आमनेसामने, इम्तियाज जलील माघारी फिरले...

सुजात आंबेडकर यांनी दिला नारे तकबिर अल्लाहु अकबरचा नारा, नवीन वसलेल्या वस्तींना छत्रपती संभाजीनगर नाव द्यावे, याला मुस्लिम समाजाचा विरोध नाही. अल्होपसंख्याक समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात नेहमी वंचितने आवाज बुलंद केली करत राहणार... बाबा रामगिरी व नितेश राणे यांना केली अटकेची मागणी.... संसदेत अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात बोलायला काँग्रेस तयार नाही, आंबेडकर विभागीय आयुक्त कार्यालयात शिष्टमंडळासोबत आले...धरणे आंदोलनात मोहम्मद हिशाम उस्मानी व फैसल खान यांनी आपले मत मांडले....

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या वतीने बाबा रामगिरी व नितेश राणे यांना अटक करावी व विविध मागणीसाठी मागिल 24 दिवसांपासून बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. या धरणे आंदोलनाला विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अटकेची कारवाई होत नसल्याने राज्यभर आज दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले. सरकार मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कौन्सिलने दिला आहे. धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मंडपात आपल्या पक्षाच्या नेत्यासह आगमन झाले. त्यांनी आपल्या भाषणात आंदोलकांच्या मागणी रास्त आहे. सरकारने कारवाई करावी नसता आंदोलन तीव्र करण्यासाठी वंचित आपल्यासोबत आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात जी वक्तव्य केली जात आहे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितचे आमदार निवडून द्या पैगंबर बील मंजूर करण्यासाठी आमचे आमदार विधानसभेत आवाज उठवतील असा शब्द दिला. औरंगजेब यांच्या कबरीवर अॅड बाळासाहेब आंबेडकर गेले होते त्याबद्दल जातीयवादी पक्ष राजकारण करतात. तेच एकमेव नेते आहेत अशी हिंमत दाखवतात. ज्या ठिकाणी दंगली घडल्या पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित रस्त्यावर उतरून आवाज उठवते. अल्पसंख्याक समाजात काही आणखी जाती आहेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी मुस्लिम समाजाला अल्पसंख्याक म्हणून संबोधतात मुस्लिम का म्हणत नाही असा सवाल उपस्थित केला. यावेळी आपले भाषण त्यांनी नारे तकबिर अल्लाहु अकबर म्हणत सुरू केल्याने उपस्थितांनी दाद दिली. वंचित हा पक्ष एमआयएम सारखा नारा देत मतांसाठी राजकारण करत आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर वंचितचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार जावेद कुरैशी, अफसरखान, तय्यब जफर, एड रामकुमार सोनोने व विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जावेद कुरैशी यांना निवडून देण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले. यावेळी मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे पदाधिकारी यांचे भाषण सुरू असताना माजी खासदार इम्तियाज जलील यांचे आगमन झाले. त्यांनी वंचितचे नेते व्यासपीठावर उपस्थित असल्याचे दिसताच मंडपाच्या बाहेर थांबून धरणे आंदोलनाला हजेरी लावली. वंचितची टिम व नुमायंदा कौन्सिलचे पदाधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या मागणीचे निवेदन दिले.

यावेळी एड फैज सय्यद, मुनतजीबोद्दीन शेख, मौलाना हाफिज शरीफ निजामी, मौलाना नोमान नदवी, मौलाना अब्दुल कवी फलाही, मौलाना अन्वरुल इशाअती, यासेर सिद्दीकी, मोहम्मद हिशाम उस्मानी, फैसल खान, नासेर सिद्दीकी, मोहम्मद हुसेन रजा, कामरान अली खान, शोयेब सिद्दीकी, सलिम सिद्दीकी, अब्दुल वहीद बा हुसेन, मौलाना शफीक मिल्ली, अब्दुल मोईद हशर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow