बारावी बोर्डाच्या परीक्षेत 94.08 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, तनिषा बोरामणीकराचे वाणिज्य शाखेत यश

 0
बारावी बोर्डाच्या परीक्षेत 94.08 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, तनिषा बोरामणीकराचे वाणिज्य शाखेत यश

बारावी बोर्डाच्या परीक्षेत 94.08 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 

बीडने प्रथम क्रमांक पटकावला तर औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर, विद्यार्थ्यीनींची पुन्हा बाजी

औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) बारावी बोर्डाचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला आहे. औरंगाबाद मंडळातील 94.08 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर बीडने प्रथम क्रमांक पटकावला तर औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुली जास्त उत्तीर्ण झाल्याने पुन्हा त्यांनी बाजी मारली आहे. अशी माहिती विभागाच्या सचिव डॉ.वैशाली जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी 22 मे ते 5 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. प्रती विषय 50 रुपये फिस भरावी लागेल. उत्तर पत्रिका छायांकीत प्रतसाठी प्रतिविषय चारशे रुपये तर मुल्याकणासाठी प्रतीविषय तीनशे रुपये भरावे लागणार आहे.

देवगिरी काॅलेजची विद्यार्थ्यीनी तनिषा सागर बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तीने 600 पैकी 600 गुण प्राप्त करून शंभर टक्के गुण मिळवले. तीला स्पोर्ट्स चे गुण पण मिळाले आहे म्हणून सर्वच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

निकाल बघितला तर औरंगाबाद 93.85, बीड 94.47, परभणी 89.36, जालना 93.35, हिंगोली 90.64 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. औरंगाबाद मंडळात एकूण 1,80,441 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर प्रविष्ट 1,78,749 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी 1,66,201 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

एकूण विद्यार्थीनी 93.29 तर मुले 93.29 टक्के उत्तीर्ण झाले.

विज्ञान शाखेत 103771, 98.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत 010697, 93.02 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत 046313, 86.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, एचएससी व्होकेशनल 002734, 85.41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टेक्निकल सायन्समध्ये 00247, 93.56 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 94.08 आहे. विभागात परीक्षा केंद्रावरील गैरमार्ग प्रकरणे 151 तर परिक्षोत्तर गैरमार्ग प्रकरणे 39. एकूण 190 गैरमार्ग प्रकरणी चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली. संबंधित विषयांची संपादणूक रद्द - 119, परीक्षोत्तर 32.

परीक्षार्थी निर्दोष निकाल जाहीर - 032, परीक्षोत्तर 07.

महाराष्ट्रातील निकाल बघितला तर 93.37 टक्के विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये पुणे 94.44, नागपूर 92.12, औरंगाबाद 94.08, मुंबई 91.95, कोल्हापूर 94.24, अमरावती 93.00, नाशिक 94.71, लातूर 92.36, कोकण 97.51, एकूण 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow