तारा पान सेंटरचे मालक हाजी शरफोद्दीन यांचे निधन, आज रात्री 10 वाजता दफनविधी

 0
तारा पान सेंटरचे मालक हाजी शरफोद्दीन यांचे निधन, आज रात्री 10 वाजता दफनविधी

तारा पान सेंटरचे मालक हाजी शरफोद्दीन यांचे निधन, आज रात्री 10 वाजता दफनविधी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) उस्मानपूरा येथील प्रसिद्ध तारा पान सेंटरचे मालक हाजी शरफोद्दीन सिद्दीकी(अंदाजे वय 75) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. हाजी शरफोद्दीन हे सर्वांनाच परिचित होते. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे तारा पान सेंटरचे पान प्रसिध्दीच्या झोतात होते. आज त्यांच्या निधनाची बातमी सोशलमिडीयावर आली. आज गुरुवारी रात्री 10 वाजता उस्मानपूरा बडी मस्जिद येथे नमाज-ए-जनाजा अदा केली जाईल. दफनविधी उस्मानपूरा कब्रस्तानात होणार आहे. त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा नाती पोती असा मोठा परिवार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow