केंद्रीय पथकाद्वारे दुष्काळी स्थितीचा पाहणी, कधी मिळणार शेतकऱ्यांना मदत

 0
केंद्रीय पथकाद्वारे दुष्काळी स्थितीचा पाहणी, कधी मिळणार शेतकऱ्यांना मदत

केंद्रीय पथकाद्वारे दुष्काळी स्थितीची पाहणी, कधी मिळणार शेतकऱ्यांना मदत 

औरंगाबाद,दि.13(डि-24 न्यूज):- जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी आज केंद्रीय पथकाने केली. या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी ए.एल. वाघमारे व मुल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरिष हुंबर्जे यांचा समावेश होता. या अपथकाने छत्रपती संभजीन्गर तालुक्यातील तुळजापूर, चौका, मोरहिरा, धनवड व सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा, फर्दापूर आणि धनवट या गावांना भेटी देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान कृषी सहसंचालक तुकाराम मोटे, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, लतिफ पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.झोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा माने, तहसिलदार रमेश मूनलोड, मोहनलाल हरणे, गटविकास अधिकारी मीना रावताडे तसेच कृषी व महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow