उद्यापासून राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प होणार

 0
उद्यापासून राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प होणार

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी उद्यापासून पासून राज्यव्यापी संप 

17 लाख शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश  

 औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी गुरुवारपासुन शासकीय-निमशासकीय तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. या संपात 

सुमारे राज्यातील 17 लाख कर्मचारी सहभाग नोंदविणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष देविदास जरारे यांनी डि-24 न्यूजला दिली आहे. 

त्यांनी सांगितले शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मार्च 2023 मध्ये बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्याची लेखी हमी दिली होती. त्याचप्रमाणे अन्य 17 मागण्यांबाबत निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिले होते. त्यामुळे संप मागे घेण्यात आला होता. मात्र गेल्या 6 महिन्यानंतरही सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारी कर्मचारी, शिक्षक संतप्त झाले आहेत. राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी 14 डिसेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. या काळात दररोज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलनात सुमारे 40 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामधे सुमारे अकरा हजार महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. या संपात अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष देविदास जरारे, भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस एन. एस. कांबळे, जि. प. सरचिटणीस संजय महाळकर, अनिल सुर्यवंशी, सुरेश करपे, लता ढाकणे, परेश खोसरे, वैजनाथ विघोतेकर, इंदुमती थोरात, अशोक वाढई, सतीष भदाणे, रामेश्वर मोहिते, ज्ञानेश्वर लोधे, उर्मिला धारुरकर, काशीनाथ बिरकलवाड, शेख आरीफ आदींनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow