नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवारी, 6304 उमेदवारांची बैठक व्यवस्था

 0
नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवारी, 6304 उमेदवारांची बैठक व्यवस्था

नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि.25); 6304 उमेदवारांची बैठक व्यवस्था

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा ही रविवार दि.25 मे रोजी होणार आहे. या परीक्षांसाठी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर 6304 उमेदवार प्रविष्ठ होणार आहेत,अशी माहिती जिल्हा पर्यवेक्षकीय समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सामान्य श्रीमती संगीता राठोड यांनी दिली आहे.

संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत जिल्हा केंद्रावर रविवार दि.25 मे रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 होणार आहे. परीक्षेच प्रत्यक्ष कालावधी सकाळ सत्रात 9.30 ते 11.30 व दुपार सत्रात 2.30 ते 4.30 या प्रमाणे आहे.

 एकूण 22 उपकेंद्रावर या दोन्ही परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी एकूण 6304 उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात आला आहे.

परीक्षेसंदर्भात संघ लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या सुचनाः-

उमेदवारांना प्रत्यक्ष परीक्षेच्या दीड तास अगोदर परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येणार असून प्रत्यक्ष परीक्षेच्या अर्धातास अगोदर परीक्षा उपकेंद्राचे मुख्य गेट बंद करण्यात येऊन त्यानंतर कोणत्याही उमेदवारास परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही.

उमेदवारांने आयोगाच्या संकेतस्थळा वरुन प्राप्त केलेले ई-प्रवेशपत्र, ओळखीचा मुळ पुरावा, काळा पेन व हातातील साधी घड्याळ या व्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य परीक्षा उपकेंद्रावर घेऊन जाण्यासस प्रतिबंध असेल.

उमेदवाराने त्यांची बॅग, सॅक, मोबाईल व इतर साहित्य परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर सोबतच्या व्यक्तीजवळ अथव स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा उपकेंद्र सोडून इतर ठिकाणी ठेवावे. साहित्य गहाळ अथवा चोरी झाल्यास आयोग अथवा पर्यवेक्षक जबाबदार राहणार नाही. 

परीक्षेसाठी एकूण 1050 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

  परीक्षा केंद्र याप्रमाणे :-

1. शासकीय फार्मसी (औषध विज्ञानशास्त्र) महाविद्यालय, उस्मानपुरा - 192

2. मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉर्मस डॉ.रफिक झकेरिया कॅम्पस, सायन्स बिल्डींग, 

     रोझा बाग हर्सुल रोड - 288

3. मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉर्मस टॉम पॅट्रीक बिल्डींग, सायन्स बिल्डींग, रोझा 

    बाग हर्सुल रोड - 384

4. डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा, ज्युबली पार्क – 384

5. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड उस्मानपुरा – 288

6. डॉ. सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महविद्यालय, समर्थ नगर – 288   

7. से.फ्रान्सिस डे.सेलस हायस्कूल जालना रोड – 384

8. सरस्वती भुवन, मुलांची शाळा, सरस्वती कॉलनी औरंगपुरा – 384

9. सरस्वती भुवन, विज्ञान महाविद्यालय औरंगपुरा – 192

10. विवेकानंद कला व सरदार दिलीपसिंग वाणिज्य महाविद्यालय, समर्थ नगर – 288

11. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थ नगर -288

12. श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, एन - 8 सिडको – 288

13. शिशु विहार हायस्कूल, महात्मा फुले चौक, औरंगपुरा -288

14. सरस्वती भुवन, कला व वाणिज्य महाविद्यालय, (पार्ट - अ) औरंगपुरा – 384

15. सरस्वती भुवन, कला व वाणिज्य महाविद्यालय, (पार्ट - अ) औरंगपुरा – 384

16. मिलिंद विज्ञान महाविद्यालय, नागसेन वन परिसर, छावणी परिसर – 288

17. बळीराम पाटील हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, एन-9, एम-2 – 192

18. मुकुल मंदीर हायस्कूल एन – 7 सिडको - 288

19. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड उस्मानपुरा – 288

20.वसंतराव नाईक महाविद्यालय, लेमन ट्री हॉटेल जवळ जालना रोड – 277

21. शिव छत्रपती महाविद्यालय, एन -3 सिडको, उच्च न्यायालय जवळ – 225

22. शासकीय कला व विज्ञान महविद्यालय, सुभेदार गेस्ट हाऊस जवळ किलेअर्क, लेबर कॉलनी - 41

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow