अफसरखान यांना वंचितचा धक्का, अपक्ष उमेदवारी दाखल करणार, एमआयएमचा होणार फायदा...?
अफसरखान यांना वंचितचा धक्का, अपक्ष उमेदवारी दाखल करणार, एमआयएमचा होणार फायदा...?
वंचितचे कार्यकर्ते संभ्रमात...
औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसरखान यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज उद्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करुन दाखल करणार असल्याचे पत्रकात परिषदेत घोषणा केली. यामुळे असे दिसून येत आहे की अफसरखान यांची उमेदवारी वंचितने रद्द केली आहे अशी अधिकृत घोषणाही वंचितच्या वतीने करण्यात आली नाही नेतेही याबद्दल बोलायला तयार नाही की उमेदवार बदलला की माघार घेतली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमची ताकत असताना विद्यमान खासदार असताना वंचितने येथे मुस्लिम उमेदवार दिल्याने नाराजी पसरली होती. अफसरखान यांनी मतदारसंघातून प्रचारही सुरू केला होता. एमआयएमचे सुप्रीमो खा.असदोद्दीन ओवेसींनी अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचा हा परिणाम आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे. अकोला निवडणुकीत मुस्लिम मते मिळणार नाही याचा फटका बसू नये म्हणून अफसरखान यांची उमेदवारी रद्द केली अशीही चर्चा आता मतदारांमध्ये सुरू झाली आहे. त्यांना आतापर्यंत एबी फाॅर्म सुध्दा देण्यात आला नाही. अफसरखान यांनी सांगितले असे का झाले मला माहित नाही अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर सांगणार आहे कि धोका का झाला. अफसरखान यांची उमेदवारी रद्द झाल्याने इम्तियाज जलील यांना या निवडणुकीत फायदा होईल असेही बोलले जात आहे.
What's Your Reaction?