खैरेंचा आणि विकासाचा काहीच संबंध नाही - पालकमंत्री संदीपान भुमरे

 0
खैरेंचा आणि विकासाचा काहीच संबंध नाही - पालकमंत्री संदीपान भुमरे

जिल्ह्यातील पाणी प्रश्न आणि विकास कामांसाठी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांना निवडून द्या...

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे मतदारांना आवाहन... औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) गेल्या वीस वर्षांमध्ये विरोधकांनी कोणतेही विकास कामे केले नाही, असा आरोप करत ही लोकसभेची लढाई विषारी राजकारणा विरोधात असून विकासकामांसाठी आमची प्रामाणिक लढाई आहे. इथला पाणी प्रश्न आजही प्रलंबित असल्याने तो सोडवण्यासाठी आणि विविध विकासकामे करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील मतदारांना केले. महायुतीच्या मध्यवर्ती कार्यालयात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.२३) आयोजित सर्वपक्षीय प्रमुख नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्न साकार करण्यासाठी सच्चे शिवसैनिक असलेले महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून लोकसभेत पाठवा असे आवाहन करत विरोधक असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर जहरी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली.

शक्तीप्रदर्शन करणे ही राजकारणाची गरज आहे त्यामुळे ती दाखवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून ताकद उभी करावी. स्वर्गीय बाळासाहेबांनी जी स्वप्न पाहिली होती ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले तर विरोधकांवर आपली तोफ डागत शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचेही भाषण झाले. महायुतीचे लोकसभा उमेदवार संदीपान भुमरे म्हणाले की, ठाकरे गटाकडे बघू नका, उमेदवाराचे संतुलन बिघडले आहे. चार तारखेनंतर त्यांना कुठेतरी ऍडमिट करावे लागेल. ते फक्त टीका टिप्पणी करणार.

खैरे आणि विकासाचा काहीही संबंध नाही...

माझ्यावर टीका करताना खैरे यांनी अगोदर विकासावर बोलले पाहिजे. मुळात खैरे आणि विकासाचा काहीही संबंध नाही. गेल्या वीस वर्षात त्यांनी कोणतेही विकासाचे काम केले नाही. खैरेनी फक्त खान आणि बाण केले. आता ते खानाला मीठ्या मारताय.. त्यांच्या सारखं आमचं हिंदुत्व नाही. अशा शब्दात खैरेंचा समाचार आपल्या भाषणातून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी खैरेंचा घेतला. आपल्याला २४ तास पाणी द्यायचे आहे आणि हे पाणी पैठण वरून येणार आहे. आपल्याला कुणावर टीका करायची नाही. खैरेंचा आणि विकासकामांचा काहीच संबंध नाही त्यामुळे त्यांना २० वर्षात काय केले हे सांगता येत नाही. असे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर औरंगाबाद लोकसभा निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज सर्वपक्षीय प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आणि मेळावा महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात घेण्यात आली. यावेळी गृहनिर्माण व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, मनसेचे राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, शहराध्यक्ष सुमित खांबेकर, महानगर प्रमुख बिपिन सरनाईक, जिल्हा सचिव प्रशांत जोशी, रस्ते, आस्थापना, जिल्हा संघटक अशोक पवार पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष, संजय ठोकळ, दौलत खरात, माजी नगरसेविका माधुरी अदवंत, भाजप महिला आघाडीच्या मनीषा मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर, संपर्क प्रमुख रंजना कुलकर्णी, सविता किवांडे, भाजप उद्योग आघाडीच्या सविता कुलकर्णी, महानगर प्रमुख शारदा घुगे, मनसे च्या महिला जिल्हाध्यक्ष लिला राजपूत, यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow