आदर्श घोटाळा अधिवेशनात गाजला, खासदार इम्तियाज जलील यांच्यानंतर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला प्रश्न

 0
आदर्श घोटाळा अधिवेशनात गाजला, खासदार इम्तियाज जलील यांच्यानंतर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला प्रश्न

आदर्श नागरी पतसंस्थेतील गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारला सवाल... लोकसभेच्या अधिवेशनात खासदार इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला आता गुंतवणूकदारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे...

नागपूर,दि.13(डि-24 न्यूज) आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात सरकारला विचारला.

 आदर्श नागरी पतसंस्थेत सुमारे 202 कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाला आहे. या पतसंस्थेत शेतकरी, सामान्य नागरिक यांची मोठया प्रमाणात गुंतवणूक आहे. संचालक मंडळाने गुंतवणूकदारांच्या खोट्या सह्या घेऊन कर्ज काढले. त्यानंतर गुंतवणूकदारांना नोटीस आल्या आहेत. यावर कारवाईसाठी

गतीने पावलं उचलण्याची आवश्यकता असताना ती उचलली जात नाही याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 

   तसेच गुंतवणूकदारांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांच्या तीव्र भावना उमटल्या आहेत. त्यामुळे सरकार व संबंधित खात त्यांना न्याय केव्हा देणार , असा प्रश्न आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला.

   या पतसंस्थेच्या मालमत्तांचे मूल्य मोठया प्रमाणात निघालं आहे , तरी खातेधारकांना न्याय मिळाला नाही त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली. 

   त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात आलं की , या पतसंस्थेत 180 कोटी रुपयांचा अफरातफर झाली आहे. लेखा परीक्षण अहवालात

संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी अशा 51 जणांवर 103 कोटी 17 लाख रुपयांचा अपव्यवहारांचा गुन्हा दाखल केला आहे. यात 12 संचालक, 1 व्यवस्थापक, 3 कर्मचारी ,14 व्यक्तिगत कर्जदार, संस्था कंपनी, 12 जमीनदार, 2 सनदी लेखापाल यांचा समावेश आहे. 15 लोकांना अटक व दोघांना जामीन मिळाला आहे. 

हे पैसे वसूल करण्यासाठी सरकार पुढाकार घेत असून जबाबदारी निश्चित करण्यासाठी कारवाई सुरू आहे. ती त्वरेने सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत. 876 कर्जदारांकडून 

2 प्रॉपर्टी ताब्यात घेतल्या आहेत. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले आहेत. 18 मालमत्ता 22 कोटी 87 लाख लिलावद्वारे विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच खातेदारांना हे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow