महानगरपालिकेच्या वाहनांचे दिमाखदार पथसंचलन

 0
महानगरपालिकेच्या वाहनांचे दिमाखदार पथसंचलन

महानगरपालिकेच्या वाहनांचे दिमाखदार पथसंचलन

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या सर्व विभागात कार्यरत असलेल्या यंत्र यंत्रसामुग्रीची तसेच महानगरपालिकेची कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता शहरातील नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आज शहरात महानगरपालिका यांत्रिकी विभागाच्या वतीने सद्या कार्यरत असलेल्या वाहनांचे दिमाखदार पथ संचलन करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी,शहर अभियंता ए बी देशमुख,कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या पथ संचलन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

सेंट्रल नाका येथून पथ संचलानाची सुरुवात झाली.सेव्हन हील मार्गे मुकुंदवाडी - चिकलठाणा - सिडको बसस्टँड - हर्सूल - हडको कॉर्नर - दिल्ली गेट - मील कॉर्नर - महावीर चौक - रेल्वे स्टेशन - महानुभाव आश्रम - एम आय टी कॉलेज - देवळाई चौक - सूर्या लॉन - शहानूर मियादर्गा गेट - सुत गिरणी चौक - गजानन महाराज मंदिर - सेव्हन हील - आकाशवाणी - क्रांती चौक मार्गे आमखास मैदान येथे सांगता करण्यात आली.यावेळी एकूण 30 वाहनांनी या पथ संचलनात सहभाग नोंदवला. यात आरोग्य,यांत्रिकी ,अग्निशमन , घन कचरा, उद्यान, स्मार्ट सिटी बस ,प्रशासकीय अधिकारी यांचे यांचे प्रत्येकी एक वाहनाचा यात समावेश होता.

  नागरिकांनी या पथ संचलनाचे थांबून कौतुक केले.

या पथ संचलन कार्यक्रमासाठी कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी व यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow