महापुरुषांच्या स्मारकांची तांत्रिक बाजू (Structural Audit) तपासण्यासाठी मनपा प्रशासकांकडे मागणी

 0
महापुरुषांच्या स्मारकांची तांत्रिक बाजू (Structural Audit) तपासण्यासाठी मनपा प्रशासकांकडे मागणी

महापुरुषांच्या स्मारकांची तांत्रिक बाजू (strcrural audit) तपासा

अभिजित देशमुख यांची मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.30(डि-24 न्यूज) सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडल्याने समस्त शिवप्रेमीसाठी हि घटना वेदनादायी आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) शहरात विविध परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबरोबरच इतर महापुरुषांच्या स्मारकांची तांत्रिक बाजू (strcrural audit) तपासण्यात येऊन स्वतः शहनिशा केल्यानंतर संबंधित विभागांना तातडीने आपण आदेशित करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांच्याकडे केली आहे. 

  या निवेदनात म्हटले आहे कि, शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे. संपूर्ण मराठवाड्यातून याठिकाणी शिवप्रेमी शिवजयंतीला येतात. तसेच विविध उपोषण, आंदोलनाची सुरुवात याच ठिकाणाहून होते. त्यामुळे या स्मारकाची पुन्हा एकदा तांत्रिक बाजू तपासण्यात येवून पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी केली आहे. याशिवाय नव्याने शहरातील टीव्ही सेंटर चौक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, भडकल गेट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेले डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक तसेच अनेक पुतळ्यांचे करण्यात येणारे सुशोभिकरन हे संपूर्ण बाजूने तपासून चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी आपण स्वतः लक्ष घालून कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड होऊ नये व संपूर्ण स्मारकांची पुर्ण काळजी घेण्यात यावी असे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow