डॉ.शरदकुमार दिक्षित स्मृतिप्रित्यर्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा प्रारंभ, नातेवाईकांच्या चेह-यावर हसु फुलले

 0
डॉ.शरदकुमार दिक्षित स्मृतिप्रित्यर्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा प्रारंभ, नातेवाईकांच्या चेह-यावर हसु फुलले

डॉ. शरदकुमार दीक्षित स्मृत्यर्थ :

लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणा आयोजित

 मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला भव्य प्रारंभ

472 रुग्णांची तपासणी - 350 होणारं शस्त्रक्रिया

रुग्णांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच खरे समाधान

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणार्फे आणि महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर तसेच औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 47 व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उदघाटन लायन्स प्रांतपाल लां. सुनील देसरडा यांच्या हस्ते आज बुधवार, दि. 13 रोजी उत्साहात झाले. गोरगरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणाऱ्या, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करऱ्या या प्रकल्पाला डॉ. शारदकुमार दीक्षित यांच्या थोर आणि समर्पणभावनेच्या कार्याची असलेली परंपरा अशीच पुढे नेण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला.

सिडकोतील लायन्स आय हॉस्पिटल यथे झालेल्या या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर अमेरिकेहून आलेले डॉ. राज लाला, लायन्स प्रांतपाल सुनील देसरडा, डॉ. अमित बसन्नवार यांच्यासह क्लबच्या अध्यक्ष ला. डॉ. उज्वला दहीफळे प्रकल्प प्रमुख ला. भूषण जोशी, एमजीएमचे डीन डॉ. राजेंद्र बोहरा, ड्रुगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन देशमुख, क्लब सचिव ला. संदीप ताठे, सिटी क्लबचे ला. रवी राजपाल, आदी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने तसेच डॉ. दीक्षित यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ला. सुनील देसरडा यांनी, या शिबिराच्या माध्यमातून होत असलेल्या रुग्णसेवेचा, अतिशय समर्पणभावनेने करण्यात येणाऱ्या कार्याचा गौरव केला. अमेरिकेहून दरवर्षी येणारे डॉक्टर आणि हे शिबीर गेली 46 वर्षे सातत्याने चालविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य करणाऱ्या लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले. अत्यंत समर्पणभावनेने आणि सातत्याने केले जात असल्यामुळेच मानवसेवेची ही चळवळ आज इतके मोठे स्वरूप धारण करून वाढतच चालली आहे, असे ते म्हणाले.

 

डॉ.. दीक्षित यांच्याबरोबर सातत्याने या शिबिरांमध्ये सहभाग घेणारे डॉ. राज लाला यांनी, डॉ. दीक्षितांचे हे कार्य पुढे सुरु ठेवण्याची हमी दिली. दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याइतके पुण्यकर्म कोणतेच नाही आपल्या सेवेतून आम्हाला ते प्राप्त होते. रुग्णसेवेपेक्षा वेगळी ईश्वराची आराधना काय असू शकेल, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. आम्ही या शिबिरातून रुग्णांवर शस्त्रक्रिया करीत असलो तरी त्यांच्याकडून आम्हाला मिळणाऱ्या आनंदाला, समाधानाला व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत, असेही ते म्हणाले.

एमजीएमचे डीन डॉ. राजेंद्र बोहरा यांनी, लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणाच्या या समर्पित कार्याबद्दल आनंद वक्त केला. आपल्या संस्थेच्या वतीने या शिबिराला केले रहाणारे सहकार्य असेच पुढे सुरु राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

क्लबच्या अध्यक्ष ला. डॉ. उज्वला दहीफळे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. प्रकल्प प्रमुख ला. भूषण जोशी यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली.    

शिबिरात सहभागी रुग्णांच्या नातेवाइकांकरिता लायन्स सिटी क्लबच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या क्लबचे अध्यक्ष ला. रवी राजपाल यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी बालाजी हायस्कुलच्या लेझीम पथक आणि ढोलच्या तालात, टाळ्यांच्या गजरात प्रमुख पाहुण्यांना मंडपात आणण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. सुदर्शन पोटभरे आणि कल्याणी शुक्ला यांनी केले. क्लबचे सचिव ला. संदीप ताठे यांनी आभार मानले.

उदघाटन कार्यक्रमानंतर लगेच रुग्णांच्या तपासणीला प्रारंभ करण्यात आला. या शिबिरात नाकावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील व्रण व डाग, दुभंगलेले ओठ, पडलेली पापणी आदींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. आजच्या तपासणीअंती शस्त्रक्रियाकरिता रुग्णांची निवड करण्यात येऊन त्यांना वेळ देण्यात आली. पुढील चार दिवसात एमजीएम हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया होतील.

कार्यक्रमाला लायन्सचे राजकुमार टिबडीवाला,, सुरेश साकला, राजेश भारूका, राजेश जाधव, जयकुमार थानवी, सुरेश बापना, विजय अग्रवा, एस. ए. अग्रवाल, , विनय राठी, विनोद. चौधरी, राजेश लहुरीकर, राजेंद्र लोहिया, कल्याण वाघमारे, महेश बुऱ्हाडे, राजेश शुक्ला, संजय गुप्ता, रवींद्र करवंदे आदींसह शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow