सायबर गुन्हे रोखण्यासाठी MKCL ने आणला नवीन कोर्स, रोजगाराच्या संधीसाठी KLiC कोर्सेस नव्या रुपात
सायबर गुन्हे रोखण्यासाठी MKCL ने आणला नवीन कोर्स, रोजगाराच्या संधीसाठी KLiC कोर्सेस नव्या रुपात
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) डिजिटलच्या युगात मोबाईलवर आर्थिक व्यवहार वाढत असल्याने फसवणूकीचे प्रकार वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे म्हणून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे म्हणून आता MKCL ने रोजगाराच्या अधिक संधीसाठी KLiC कोर्सेस आता नव्या रुपात आणि MS-CIT नव्या स्किल्स सह सुरू केले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती वीना कामत यांनी दिली आहे.
यावेळी विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, विभागीय समन्वयक गजानन कुलथे, औरंगाबादचे समन्वयक सिध्दार्थ पाटील, कौशल ओव्हळ उपस्थित होते.
येणाऱ्या भविष्यकाळात संपूर्ण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व रोजगारक्षम युवा पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रोफेशनल स्किल्स व Employebility Skills लागणारे कोर्सेस महाराष्ट्रातील 4500+ केंद्रावर सुसज्ज लॅब आणि प्रशिक्षकांसोबत सुरू केले आहे. अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या MS-CIT/KLiC केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे म्हणजेच MKCL कडून करण्यात आले आहे.
नोकरी मिळवून देणारे क्लिक कोर्सेस, क्लिक इंग्लिश कम्युनिकेशन, क्लिक टॅली विथ जीएसटी, अॅडव्हान्स टॅली, अॅडव्हान्स एक्सल, ऑटोकोड, 3D माॅडेलिंग अँड लायटिंग, डिटीपी-कोरेल, डिटिपी-अॅडोबे, फोटोशॉप, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट इलस्ट्रेटर, सी प्रोग्रामिंग, सी++ प्रोग्रामिंग, कम्प्युटर हार्डवेअर सपोर्ट, नेटवर्क सपोर्ट, सेक्युरीटी सपोर्ट, डेस्कटॉप सपोर्ट, स्क्रॅच प्रोग्रामिंग, क्लिक आयओटी, ई.कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. पुढील महिन्यापासून रोबोटिक, सायबर सेक्युरीटी, मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपमेंट, रिटेल मॅनेजमेंट, BFSI या कोर्सेसचे प्रशिक्षण सुरु केले जाणार आहे. यापैकी तीन कोर्सेस एकत्र केल्यावर क्लिक डिप्लोमा असे अतिरिक्त प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सारथीच्या विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षण दिले जात आहे.
गेल्या दोन दशकांत तब्बल दीड कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी MS-CIT कोर्स केला आहे. आयटी क्षेत्रातील पायाभूत ज्ञान देणारा सर्वोत्तम कोर्स म्हणून या कोर्सची ओळख आहे. कम्प्युटर, मोबाईल आणि इंटरनेट या तीनही गोष्टींचा योग्य वापर करून हि सर्व कामे घरी बसून देखील करु शकतो. कम्प्युटर प्रत्येक व्यक्तीने शिकले पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.
What's Your Reaction?