शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज वाटप करावे - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज वाटप करावे- जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी
जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्जासाठी ऑनलाईन नोंदणी करावी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- खरीप हंगामासाठी लागणाऱ्या पीक कर्ज शेतकऱ्यांना वेळेत वाटप करण्याची दक्षता सर्व बँक शाखानी घ्यावी, शेतकऱ्यांना कमी वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जनसमर्थ पोर्टलवर नोंदणी साठी बँकांनी मदत करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केले.
पिक विमा, आवास योजना, गाय गोठा अनुदान , लाडकी बहीण या योजनेच्या शासनाकडून आलेल्या अनुदानातून कर्जाची रक्कम कपात करू नये असे निर्देश जिल्ह्यातील सर्व बँक प्रतिनिधींना जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्स समिती सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेच्या अपर मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, बँक ऑफ महाराष्ट्रचे उप अंचल प्रबंधक श्री जीवन पाटील,अमित मिश्रा आरबीआय मुंबई,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे समृत जाधव, जिल्हा उद्योग केंद्राच्या जिल्हा व्यवस्थापक करुणा खरात. सर्व शासकीय महामंडळाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत बँकांना प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून वेळेत कर्ज वितरण करावे ,नामंजूर असलेल्या कर्ज प्रस्तावाच्या बाबतीत कारणासह विवरण स्पष्ट करणारे पत्र संबंधित विभागांना सादर करण्यात यावेत.जेणेकरून त्रुटीची पूर्तता करून याबाबत वेळेत प्रस्ताव निकाले लागतील व जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी याबाबतचा उपयोग होईल. बँकेमध्ये येणाऱ्या कोणत्याही योजनांच्या कर्ज प्रस्तावावर वेळेत निर्णय घ्यावा. त्रुटीची पूर्तता करून ते कालमर्यादित निर्णय घेणे आवश्यक आहे. असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
जिल्हा पतपुरवठा आराखडा पुस्तकेचे प्रकाशन....
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या २०२६- २७ या आर्थिक वर्षाचा पतपुरवठा आराखडा पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यात आर्थिक वर्ष २०२६- २७ साठी एकुण ४० हजार५०० कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे .कृषी क्षेत्रासाठी ६ हजार २००कोटी, मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगासाठी १२ हजार २००कोटी, प्राधान्य क्षेत्रासाठी २० हजार ५००कोटी तसेच अ अप्राधान्य क्षेत्रासाठी २० हजार कोटीच्या निधीची आराखडा करण्यात आलेला आहे.
जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्जासाठी नोंदणी करावी...
जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठीची नोंदणी करावी ,जेणेकरून हे पोर्टल ॲग्रीस्टॅक नोंदणी असलेल्या शेतकरी यांच्या खात्याशी जोडले असल्याने इतर कागदपत्राची आवश्यकता असणार नाही, ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे सुलभ आणि कमी वेळेत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी मदत होईल. तसेच जनसमर्थ या पोर्टलबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बँकांनाही पुढाकार घ्यावा असे, आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले.
पीक कर्ज योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, विश्वकर्मा योजना, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, डिजिटल इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया, शैक्षणिक कर्ज योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना. या योजनांच्या उद्दिष्ट पूर्ती बाबतचा आढावा जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी सादर केला
पीक कर्ज तसेच बचत गट योजनेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या बँक प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.यामध्ये पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, एचडीएफसी बँक, फेडरल बँक, आयसीआयसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र,स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एयु स्मॉल बँक, एचडीएफसी, आयसीआयसी आय , एसबीआय, आणि कोटक महिंद्रा बँकेच्या प्रतिनिधींचा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला
.
What's Your Reaction?